यवतमाळ सामाजिक

नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ०५ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण

 

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता तिचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहायचे आहे. भाजपा कार्यकर्त्यांना जनसेवेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे . संकटसमयी मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता भाजपाचाच कार्यकर्ता असतो अशी भाजपा कार्यकर्त्याची ओळख आहे . ही ओळख जपत भाजपा कार्यकर्त्यांना कार्य करायचे आहे. कोरोना काळात आपले नेते नितीनजींनी सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी जो पुढाकार घेतला तोच आदर्श समोर ठेवून आपणही सेवाकार्य करू , असे प्रतिपादन भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य तथा पश्चिम विदर्भ प्रमुख विवेक बनगिनवार यांनी केले.

केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने मिळालेल्या ०५ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर चे वितरण भारतीय जनता पार्टी कार्यालय दिग्रस येथे करण्यात आले. गरजूंना हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर त्यांच्या वापरासाठी मोफत देण्यात येणार असुन गरजूंनी भाजपा कार्यालय दिग्रस शी संपर्क करावा असे भाजपा शहर अध्यक्ष संदीप झाडे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव प्रमोद बनगिनवार, तालुका अध्यक्ष रविंद्र अरगडे,तालुका सरचिटणीस किरण खंडारे, युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सागर वर्मा, अमित शहा, तालुका अध्यक्ष साहील जयस्वाल, शहर अध्यक्ष लोकेश शुक्ला, अल्पसंख्यांक आधाडीचे आतीक मौलाना व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©