Breaking News विदर्भ सामाजिक

पोलिसांनी गवळी समाजाच्या भाजपच्या सरचिटणीसांला निर्दयपणे केली मारहाण

 

पोलिसांनी गवळी समाजाच्या भाजपच्या सरचिटणीसांना निर्दयपणे मारहाण
केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस अधिकारी ज्या प्रकारे तरुणांना मारहाण करतात, त्यामुळे पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक भावना वाढू लागली आहे. जालना येथील रुग्णालयात तोडफोड करण्यात आल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अमानुष निर्दयी पणे मारहाण केली. पोलिसांच्या या कारवाईचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही. व्हिडिओमध्ये, पाच ते सहा पोलिस अधिकारी या युवकावर तुटून पडले कोणत्याचअप्राधाला अशा प्रकारची मारहाण करण्यात येत नाही आणि पोलिसांनी अमानुष पने लाठ्यांनी हल्ला करताना दिसत आहेत. लाठ्या तोडण्यापर्यंत पोलिसांनी त्या युवकाला काठ्या लाता बुक्या नी मारहाण केली. यामुळे पोलिसांमधील अग्रभागी कामगार कोरोना वॉरियरची प्रतिमा कलंकित केली जनतेचा विश्वास घात केला

लोकांबद्दल पोलिसाची तिस्काराची भावना दिसून. आली मागील वर्षी त्याच्याबद्दल आणि इतर कोरोना काळात कार्य करणाऱ्यांवर दीप प्रज्वलित करून, फुले वाहून, टाळ्या वाजवून आणि टाळ्या देऊन गौरव केला. त्यांच्या कार्याचे कौतुक झाले. हे जरी खरे असले तरी पोलिसाचा खरा चेहरा या घटनेवरून समोर आला .

. परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने हा प्रकार घडविला तो अन्याय कारक असुन या घटनेचा गवळी समजाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे
असाच प्रकार नागपूर येथे एका पोलिस अधिका्याने भाज्या विकणार्‍या एका गरीब महिलेच्या सर्व भाज्या उडवून दिल्या. त्याच्या बॅगमध्ये ठेवलेल्या भाज्या उचलून रस्त्यावर पसरल्या. असे करुन पोलिस तेथून निघून गेले. पोलिसांच्या या बेजबाबदारपणामुळे ही कारवाईही झाली आहे. पंजाब मध्ये ही काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला लाथा मारून भाज्यांची टोपली उडवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जर भाजीपाला विकत आहेत, लहान गाड्या या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु ही क्रिया कायद्याच्या कक्षेत असली पाहिजे. जर पोलिसांनी त्यांना दांडे आणि खांबापासून धडा शिकवण्यास सुरूवात केली तर लोकांना पोलिसांबद्दलचा असलेला तिरस्कार कमी होण्या ऐवजी वाढतच राहणार व्हिडिओ मध्ये असलेले सर्व पोलिसांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी गवळी समाजा कडून करण्यात येत आहे अन्येथा रस्त्यावर उतरू असा इशारा प्रसिद्धी पत्रकारद्वारे करण्यात आला.

Copyright ©