यवतमाळ सामाजिक

घाटंजीतील पथविक्रेते व फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य वितरित

covid-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेल्या टाळेबंदी चा मोठा परिणाम शहरातील फेरीवाले व पथ विक्रेते यांच्यावर झाला असून त्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक मदत करण्याची भूमिका शासनाने घेतली होती. त्या अनुषंगाने घाटंजीतील 272 फेरीवाले व पथक विक्रेत्यांच्या खात्यावर प्रत्येकी पंधराशे रुपयाचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्वच फेरीवाले व पथ्य विक्रेत्याचे अर्ज नागरी स्थानिक स्वराज्य संस्था निहाय मागविण्यात आले होते. यामध्ये घाटंजी शहरातील 272 अर्ज ग्राह्य झाले. नऊ अर्ज त्रुटित असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर त्यांनाही आर्थिक साहाय्य वितरित करण्यात येत असल्याचे नगर प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे नगरपरिषद अंतर्गत शहरातील वस्तीस्तर संघाला प्रति संघ 50 हजार रुपयाप्रमाणे चार संघाला निधी वितरित करण्यात आलेला आहे. सदर निधीचे वाटप नगराध्यक्ष नयना ठाकूर, उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, बांधकाम सभापती विकी ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती सुमित्रा मोटघरे, नगर परिषद सदस्य सीता गिनगुले, मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्याची माहिती नप चे प्रकल्प अधिकारी किशोर अंभोरे यांनी दिली आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©