यवतमाळ सामाजिक

भाजप सांस्कृतिक सेल यवतमाळ तर्फे आयुष काढा वाटप

सध्याच्या परिस्थितीत करोना रूग्ण संख्या वाढत आहे ही फार चिंतेची बाब आहे. करोना सेवा म्हणून निस्पृह पणे डॉ विवेक चौधरी यांनी व सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष सौ स्मिता भोयटे व सांस्कृतिक सेल चे सर्व कार्यकर्ते यांनी मा. आमदार मदन भाऊ येरावार, भाजप जिल्हाध्यक्ष मा. नितीन जी भुतडा, महामंत्री राजू भाऊ पडगीलवार याच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चौधरी आयुर्वेद व संशोधन केंद्र मध्ये घेण्यात आला तिसऱ्या लाटे पासून जीव वाचवण्यासाठी आयुर्वेदाचा हा काढा गुणकारी आहे अनेक लोकांनी याचा लाभ घेतला…..
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.राजुभाऊ पडगीलवार,महामंत्री,भाजपा तसेच प्रमुख मार्गदर्शक सौ.स्मिताताई भोईटे ,मा.प्रशांत यादव हे होते…आयुष काढ्याचे वितरण हे दि.23 मे पासून 25 मे पर्यंत जनतेच्या सेवार्थ मोफत देण्यात येत असून आयुष मंत्रालय,भारत सरकार ह्यांच्या दिलेल्या दिशा-निर्देशाद्वारे वितरित करण्यात येत आहे तसेच औषधीय सेवन करून ह्याचा उपयोग व सोबत केली जाणारी क्रिया ह्यांचे पण मार्गदर्शन करण्यात आले…शिबिराचे उदघाटन मा.राजुभाऊ पडगीलवार साहेब यांच्या हस्ते झाले तसेच ह्या काढ्याचे योग्य प्रमाणात व पद्धतीने सेवन केले तर आपल्याला आयुर्वेद व निसर्गोपचार द्वारे कोरोना सारख्या महामारीवर विजय मिळविता येईल तसेच हा आपला संस्कृतीक वारसा आहे आणि तो आपण जोपासला पाहिजे…सौ.स्मिताताई भोईटे ह्यांनी आयुर्वेदिक काढ्याचे अनुभूती सांगत नैसर्गिक रित्या आयुर्वेद,निसर्गोपचार ह्याचे जीवनशैलीत कसा उपयोग केला जाऊ शकतो…आयुर्वेदिक आयुष काढा हा आयुर्वेदातील समस्त श्रेष्ठ औषधींचा संग्रह आहे ज्याने आत्मसात केले त्यांना रोग/विकार यांपासून दूर राहू शकतो…परंतु,आपल्याला आज रोगप्रतिकारक शक्ती चा अभाव आहे ह्या कारणाने आपण ह्या विळख्यात आहे…अन्यथा,समस्त बलाढ्य देश ह्यांनी भारताच्या भोजन प्रणाली,औषधी प्रणाली यांचे वैशिष्ट्य सांगितले आहे व सगळ्यात जास्त रोगप्रतिकारक शक्ती चे लोक भारतात राहतात असेही उद्गार काढले आहेत…असे कौतुक आयुष मंत्रालया मान्यताप्राप्त आयुष काढ्याचे केलेत…ह्या कार्यक्रमाला मार्गदर्शक मा.आमदार मदनभाऊ येरावार,मा.नितीनभाऊ भुतडा-जिल्हाध्यक्ष, मा.राजुभाऊ पडगीलवार-महामंत्री,सौ.स्मिताताई भोईटे,जिल्हाध्यक्षा-सांस्कृतिक सेल हे होते…कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मा.डॉ.सुधीरजी भोईटे साहेब,मा.रामभाऊ गायकवाड,मा.अमित नानटकर,डॉ.उबाळकर ,मा.अडगूलवार, इंजि.रवी ढगे,स्मिता भट,राजेंद्रकुमार दुधकोर,प्रभाकर आत्राम,अशोक आत्राम,सौ.सायली चौधरी इ.होते…आभार प्रदर्शन डॉ.विवेक चौधरी यांनी केले तसेच दि.25 मे पर्यंत ज्यांना ह्या मोफत कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी चौधरी आयुर्वेद व संशोधन केंद्र, लक्ष्मीनगर, यवतमाळ येथे संपर्क साधावा… विनंती:-आपल्या दैनंदिन प्रसिद्ध पत्रकात ही बातमी प्रसिद्ध करावी…

Copyright ©