Breaking News यवतमाळ सामाजिक

24 तासात 322 पॉझेटिव्ह, 617 कोरोनामुक्त बाहेर जिल्ह्यातील (नांदेड) एका मृत्युसह एकूण 15 मृत्यु

 

जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1448 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात 322 जण पॉझेटिव्ह तर 617 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. यातील 13 मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 6790 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 322 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6468 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3061 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1536 तर गृह विलगीकरणात 1525 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70709 झाली आहे. 24 तासात 617 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 65933 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1715 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.17, मृत्युदर 2.43 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 66, 70 वर्षीय महिला, पंढरकवडा येथील 65 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 81 वर्षीय पुरुष, वणी येथील 70 वर्षीय महिला, तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, रालेगाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला, नेर येथील 47 वर्षीय महिला, तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 66 वर्षीय पुरुष आणि नांदेड येथील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला. तर खाजगी रुग्णालयात पुसद येथील 40 वर्षीय पुरुष व यवतमाळ येथील 71 वर्षीय पुरुष दगावले.

रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 322 जणांमध्ये 204 पुरुष आणि 118 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 29 रुग्ण पॉझेटिव्ह, आर्णि 11, बाभुळगाव 22, दारव्हा 36, दिग्रस 32, घाटंजी 21, कळंब 12, महागाव 11, मारेगाव 20, नेर 9, पांढरवकडा 25, पुसद 29, राळेगाव 2, उमरखेड 21, वणी 29, झरीजामणी 8 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 581193 नमुने पाठविले असून यापैकी 578805 प्राप्त तर 2388 अप्राप्त आहेत. तसेच 508096 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1448 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 831 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1448 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 248 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 329 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 152 रुग्णांसाठी उपयोगात, 374 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 431 उपयोगात तर 745 बेड शिल्लक आहेत.

०००००००

 

वृत्त क्रमांक : 445

रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी

टेस्टिंग, ब्रेक द चेनच्या अंमलबजावणीत सातत्य राखणे आवश्यक

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

*गावस्तरावर विलागिकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश

* कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 

यवतमाळ, दि. 23 : भविष्यात कोवीड रुग्णांना विकेंद्रित पद्धतीने आरोग्य सुविधा मिळाव्यात. तसेच ज्यांना गृहविलगिकरणामधे राहण्यासाठी अडचणी आहेत, अश्या लक्षणे नसणारे व अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी ग्रामीण भागात शाळा, वसतिगृहे, मोठी सभागृहे,व प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या ठिकाणी ऑक्सिजन बेड व कंसेंट्रेटर्ससह मोठ्या प्रमाणात विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. तसेच सध्यास्थितीत रुग्ण संख्या कमी होत आहे, ही दिलासदायक बाब आहे. मात्र असे असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टेस्टिंग आणि ब्रेक द चेन अंतर्गत अंमलबजावणीत सातत्य राखने आवश्यक आहे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील सर्व उपविभाग आणि तालुका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात केलेल्या कारवाईचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्हीसीद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतूषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

तालुकास्तरीय यंत्रणेला मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरणाचे जेवढे डोजेस आले तेवढे सर्व डोजेस त्याच दिवशी संपविले पाहिजे, याची सर्वांनी खात्री करावी. लसिकरण दरम्यान लसिकरण केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या लसीबाबत डोजनिहाय पूर्वकल्पना आरोग्य विभाग तसेच टास्क फोर्स मार्फत देण्यात यावी. ग्रामस्तरीय समित्यांना सक्रिय करून जनजागृती तसेच सोशल मीडिया, व्हाट्सएप्प आदिंच्या माध्यमांतुन लोकांना माहिती द्यावी.

ब्रेक दि चेन ची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू ठेवावी. आपापल्या कार्यक्षेत्रात पॉझिटिव्हिटी वाढू नये व मृत्युदर कमी राहावा, यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. नियमानुसार गृह विलागिकरण असले तरी रूग्णांनी नियम तोडू नये, यासाठी ग्राम समित्यांनी दक्ष राहावे. आपापल्या कार्यक्षेत्रात मोठे कार्यक्रम, लग्न समारंभ यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून ब्रेक द चेन अंतर्गत नियमांचे उल्लंघन होणार नाही. उल्लंघन करणाऱ्यांवर कड़क कारवाई करावी.

पीएचसीला तापरुग्ण, ओपीडी वर येणाऱ्या रुग्णांच्या सर्व नोंदी ठेवाव्यात. लक्षणे असलेल्या तसेच खाजगी ठिकाणीचे रुग्णांची टेस्ट करावी. हाय रिस्क, लो-रिस्कची तपासणी करावी. सर्व सोयीसुविधा युक्त नवीन डीसीएचसी सुरू करण्यासाठी नियोजन करावे. ऑक्सिजनची कमतरता होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच म्युकरमायकोसीसबाबत जनजागृति करणे आवश्यक आहे. म्यूकरमायकोसीस ची प्राथमिक लक्षणे आढळताच नागरिकांनी कोणताही वेळ वाया न घालविता आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण व शहरी भागात टेस्टिंग कमी होणार नाही याची काळजी घ्या. सध्यास्थितीत टेस्टिंगचे उद्दिष्टानुसार काम होत असले आणि रूग्णांची संख्या कमी असली तरी यात सातत्य राखने आवश्यक आहे. लसीकरणाचा प्रतिसाद कमी व्हायला नको, याबाबत खबरदारी घ्या. आरोग्य विभागाने यापुढे लस वाटप करताना टास्क फोर्सची मान्यता घ्यावी. लस प्राप्त होताच एका दिवसात संपविणे आवश्यक आहे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न. प. मुख्याधिकारी, थानेदार आदी उपस्थित होते.

Copyright ©