यवतमाळ सामाजिक

*राळेगाव परिसरातील* *शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात*

 

*शेतकरी गुंतले बियाणे-खतांच्या नियोजनात*

*राळेगाव* 22
मे महिना अर्धा उलटून गेलेला असून जून महिन्याची चाहूल लागलेली आहे. रोहिणी नक्षत्र २५ मे पासून लागणार असून अनेक शेतकरी मृग नक्षत्रापुर्वी शेतामध्ये पेरणी करीत असतात. त्यामुळे पेरणीपूर्वी शेतीच्या मशागतीमध्ये शेतकरी गुंतला असल्याचे चित्र मोहदा व मेटीखेडा परिसरात दिसून येत आहे.
दरवर्षी सूर्याचा ७ जून किंवा ८ जूनला मृग नक्षत्रामध्ये प्रवेश होत असतो. मृग नक्षत्र म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवसंजीवणीच असते. कारण शेतकरी वर्गाचे संपूर्ण आर्थिक बजेटच शेतीवर अवलंबून असल्याने शेतकरी जून महिना लागताच शेतीमध्ये पेरणीसाठी लगबग सुरू करतो. तत्पूर्वी शेतीच्या मशागतीमध्ये शेतकरी गुंतलेला आऊन शेतीची नांगरणी, वखरणी करून जमीन लागवडीसाठी योग्य करण्याचे तयारीला शेतकरी लागलेला आहेत. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून पावसाच्या चांगल्या सरी येताच लागवडीसाठी शेतकरी तयार असतो. लागवडीपूर्वी शेतीची ट्रॅक्टर किंवा लोखंडी नागराचे सहाय्याने शेतीची नांगरणी करून वखरणी करून व शेतातील कचरा, काशा, तुरीचे फणकट वगैरे वेचून फक्त लागवडच करण्याचे बाकी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जून महिन्यात मृग नक्षत्रामध्ये शेतीमध्ये पेरणी केली जात असल्याने पेरणीसाठी बियाणे व खताच्याही नियोजनामध्ये शेतकरी गुंतलेला असून आपल्याला हवे ते बियाणे मिळावे यासाठी लगबग करतांना दिसून येत आहेत.

Copyright ©