यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फी माफी मिळावी !

 

मा. तहसीलदार यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस…….. कार्यकारिणी यांचे निवेदन.

संपूर्ण देशामधे कोविड १९ ची परिस्थिती असताना लॉकडाऊन मुळे शाळा, महाविद्यालये सर्व बंद आहे,तरी ऑनलाईन क्लासेस म्हणून सर्व शैक्षणिक सत्राचा कार्यक्रम सुरू आहे.तरी या लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतांना महाविद्यालयान कडून विद्यार्थ्यांना फी वसुली करिता जबरदस्ती करण्यात येत आहे. या बिकट परिस्थिती मध्ये शासनाने मध्यस्थी करून विद्यार्थ्यांची महाविद्यालईन फी माफ करावी आणि दिलासा द्यावा.सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन शिक्षण संदर्भात दिलेल्या ५०% फी माफीचा निर्णय अमलात आणावा. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे यांच्या आदेशनुसार
दारव्हा तालुका तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दारव्हा तालुका अध्यक्ष चरण पवार , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा समन्वयक निकेत तांगडे ,रा.वि.काँ.तालुका अध्यक्ष ऋषिकेश मापारे ,तालुका उपाध्यक्ष कुणाल गावंडे ,विक्रम अग्निहोत्र , राहुल चतुर व इतर सहकारी
उपस्थिती होते.

Copyright ©