यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिवसेनेच्या वतीने किट वाटप

शेकडो कोलाम पोडावर व पारधी बेड्यावर तसेच आदिवासी व गरिबांच्या वस्तीत कोरोना लसीकरण कोरोना चाचणी व जनजागृत अभियान “आधार उद्भवाचा ” प्रकल्पात सुरू करण्यात आला आहे. दिनांक 20 मे रोजी सकाळी पांढरकवडा 1500 denyकुटुंबांना “अन्ना व किराणा ” कीट वाटप करण्यात आले. पुढील टप्प्यात दररोज 1000 कुटुंबांना आधार म्हणजे कीट जाणीव जागरूकता शिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रकल्प शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते नामदार एकनाथ शिंदे ,लोकनेते आमदार संजय राठोड , खुशरू पोचा यांच्या सेवा किचन विलु पूनावाला फाउंडेशन , रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशन,सलीम खेतानी यांच्या खेतानी फाउंडेशन,जगदंबा देवस्थान ट्रस्ट तसेच शेकडो दात्यांच्या सहकार्याने चालविला जात आहे अशी माहिती “आधार उद्भवाचा ” प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रस्टचे आदिवासी नेते अंकित नैताम यांनी कळविले आहे. मदतीसाठी संपर्क..9422108866

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©