Breaking News यवतमाळ सामाजिक

*24 तासात 355 पॉझेटिव्ह, 463 कोरोनामुक्त एकूण 7 मृत्यु*. *कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत खते, बियाणे, किटकनाशके आदी माल उतरविण्याची वेळ 5 पर्यंत*

 

 

जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1361 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 21 : गत 24 तासात जिल्ह्यात 355 जण पॉझेटिव्ह तर 463 जण कोरोनामुक्त झाले असून 7 जणांचा मृत्यु झाला. यातील चार मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 7231 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 355 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6876 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3539 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1742 तर गृह विलगीकरणात 1797 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70099 झाली आहे. 24 तासात 463 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 64874 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1687 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.35, मृत्युदर 2.41 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 53 व 72 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष आणि वणी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये पुसद येथील 87 वर्षीय महिलेचा तर खाजगी रुग्णालयात 52 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 355 जणांमध्ये 212 पुरुष आणि 143 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 61 रुग्ण पॉझेटिव्ह, मारेगाव 54, पुसद 45, आर्णि 12, बाभुळगाव 14, दारव्हा 28, दिग्रस 24, घाटंजी 8, कळंब 10, महागाव 7, नेर 15, पांढरकवडा 36, राळेगाव 21, उमरखेड 2, वणी 11 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 567554 नमुने पाठविले असून यापैकी 565121 प्राप्त तर 2433 अप्राप्त आहेत. तसेच 495022 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1361 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 918 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1361 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 294 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 283 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 145 रुग्णांसाठी उपयोगात, 381 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 497 उपयोगात तर 697 बेड शिल्लक आहेत.

लसीकरणाबाबत सुचना : कोव्हीडमधून बरे झालेल्यांनी सुट्टी झाल्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीनंतर लस घ्यावी. लसीकरणानंतर 14 दिवसांनी किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रक्तदान करता येते. कोव्हीशिल्ड चा दुसरा डोज 12 ते 16 आठवड्यानंतर तर कोव्हॅक्सीनचा दुसरा डोज चार आठवड्यांनतर घ्यावा. बाळांना दूध पाजणा-या सर्व मातांना कोव्हीड लसीकरण करता येते.

____________________________

कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत

खते, बियाणे, किटकनाशके आदी माल उतरविण्याची वेळ 5 पर्यंत

ब्रेक दि चेन अंतर्गत सुधारीत आदेश

यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंध घालून देण्यात आले होते. मात्र आता सदरील आदेशात काही प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या असून खालीलप्रमाणे सुधारीत आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

शासकीय कार्यालये 15 टक्के उपस्थितीमध्ये सुरु राहतील. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हाताची स्वच्छता इ. कोविड त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. खरीप हंगाम लक्षात घेता कृषी सेवा केंद्र, बि-बियाणे, खते, किटकनाशके, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन विक्री दुकाने, कृषी साहित्य व कृषी अवजारे इत्यादींची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. तसेच कृषी निविष्ठा – खते, बियाणे, किटकनाशके ह्यांचा माल उतरविण्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुभा राहील.

बँकींग सेवा देणारे (सीएसपी) आणि (बीसी) यांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन सेवा देता येईल. मात्र प्रत्येक ठिकाणी कोविड त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक राहील. (मास्क लावणे, सोशल डिस्टसींग, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हाताची स्वच्छता.) शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने करण्यासाठी बँका त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील.

या व्यतिरिक्त यापूर्वीच्या आदेशातील सर्व सुचना जशाच्या तशा लागू राहतील. मास्क लावणे, सोशल डिस्टसींग, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हाताची स्वच्छता इ. कोविड त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन होत नाही असे दिसून आल्यास संबंधीत सर्व आस्थापनांना पहिल्यावेळी रुपये 5 हजार दंड व त्यानंतर प्रत्येक वेळी रुपये 10 हजार रुपये हंड आकारण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा‍ जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

__________________________

म्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 21 : ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा ‘म्युकरमायकोसीस’ हा आजार बुरशीजन्य सुक्ष्म जंतुमुळे होतो. सध्या या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांनी लक्षणे आढळताच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोणाला होतो हा आजार : रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, मधूमेह, कोरोनारुग्ण, जंतुसंसर्ग असणा-यांना तसेच अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना आणि कर्करोग असणा-या रुग्णांचा म्युकरमायकोसीस होण्याची शक्यता असते.

आजाराची लक्षणे : डोळ्या व नाकाभोवती दुखणे व लाल होणे, ताप, नाकातून रक्तस्त्राव, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या, दात दुखणे, जबड्यावर सुज येणे, लकवा, मिरगी.

कसा होतो हा संसर्ग : रुग्णालयात ऑक्सीजन देतांना ह्युमीडीफायर बॉटलमध्ये डिस्टील वॉटर भरणे आवश्यक असते. तसेच एसी वेळोवेळी स्वच्छ व निर्जंतणूक करणे आवश्यक आहे.कोरोना रुग्णाच्या घरातून सुध्दा हा संसर्ग होऊ शकतो.

काय करावे : लक्षणे दिसू लागताच त्वरीत नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डायबिटीज कंट्रोल ठेवणे, कोव्हीडनंतर डायबिटीज तपासणी करावी. स्टेरॉईडचा वापर योग्य प्रमाणात करावा. ह्युमीडीफायर बॉटलमध्ये डिस्टील वॉटर वापरावे. योग्य प्रमाणात ॲन्टीनमोटीक्सचा वापर करावा. मास्क नेहमी वापरावा व वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.

Copyright ©