यवतमाळ सामाजिक

कडधान्य आयात व खतांच्या दरवाढ विरोधात आज नरेश वाढेकर तालुकाध्यक्ष जालना यांच्या वतीने ताली-थाली बजाव आंदोलन करण्यात आले

 

आज सायंकाळी जालना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुर, मूग, उडीद या कडधान्यांची आयात थांबवावी व रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावे या प्रमुख मागणीसाठी आज २० मे २०२१ गुरुवारी सायंकाळी जामवाडी येथे ताली-थाली बजाव आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात जालना तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा अाहे
राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या ताली – थाली आंदोलन च्या आव्हानाला जालना तालुक्यातील शेतकर्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे यावेळी महादेव थुटे तालुकाध्यक्ष घनसावंगी, संदीपान जिजा मुकणे, नरहरी जाधव, निवृत्ती आबा मुकणे, आण्णा फुलारी, गुलाब सोनवणे, नारायण गायकवाड, बंडू भाऊ खोट चित्रभूज खांडेकर, योगेश वाढेकर, दिपक वाढेकर, सावता बडदे, संतोष बडदे, बळिराम वाढेकर, आकाश वाढेकर,आदी मोठ्या प्रमाणात हजर होते. यावेळी सर्व सरकारी नियमांचे पालन करून व सोशियल डीस्टंट ठेवून आंदोलन करण्यात आले

Copyright ©