Breaking News यवतमाळ सामाजिक

*वनरक्षकास अज्ञात वाहनाने चिरडले*

 

यवतमाळ : १७

नाकापार्डी रोड वरील खरद व जांब या दोन्ही गावाच्या मधात आपल्या हिरो होंडा नी कर्तव्य बजावत असताना अज्ञात वाहनांनी कट मारून त्यांना चिरडल्याचे बोलल्या जात आहे वनरक्षक विनायक केतकर, यांचे वय ५८ होते तर माजी सैनिक म्हणून त्याची ओळख होती हे जात असताना हि दुर्दैवी घटना घडली विशेष म्हणजे 2 महिन्या नंतर सेवानिवृत्त होणार होते नाका पार्डी बीट येथील फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षक या पदावर सेवा देत असताना ही घटना दुपारच्या दरम्यान अंदाजे ३.५०. वाजता घडली त्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला हिरो होंडा क्रमांक एम एच २९ / ६६३१ हि त्यांची होंडा असून अजुन प्रयंत कोणताही पुरावा हाती आला नसल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती होताच हिवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहे

Copyright ©