यवतमाळ सामाजिक

*खत पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किमती विरोधात राळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन*

 

 

(माननीय तहसीलदार मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन सादर)

राळेगाव प्रतिनिधी

कोरोणा महामारी अनेकांचा रोजगार गेला, अनेक कुटुंबाचा कुटुंब प्रमुख हिरावला गेला, त्यात केंद्र सरकारने केलेली जीवघेणी दरवाढ अनेकांचा श्वास रोखत आहे. या मनमानी दरवाढीचा व त्यातून होणाऱ्या लुटीला कारणीभूत असणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा राळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला.
रासायनिक खताच्या किमती 40 टक्क्यांनी वाढविण्यात आल्या, बियाण्या मध्येही भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल शंभरीच्या पार झाले आहे. तर डिझेल ही शंभर रुपयाच्या आसपास आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. घरगुती गॅस सिलेंडर एक हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचत असल्याने गोरगरीब जनतेला संपलेला सिलेंडर भरून आणणे परवडेनासे झाले आहे. उज्वला योजनेतील गॅस कनेक्शन 90 टक्के बंद असून जनता पुन्हा चुली फुंकायला लागली आहे. तेव्हा या मनमानी दरवाढीचा व त्यातून होणाऱ्या लूटीला कारणीभूत असणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारचा राळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. खत बियाणे पेट्रोल डिझेल सिलेंडर यांच्या किमती पूर्ववत कराव्यात अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना राळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, राळेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजिंक्य वैद्य, राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंत पोटफोडे, राळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष तेजस ठाकरे, निखिल अरूनराव राऊत, कुनाल भास्करराव केराम उपस्थित होते.

Copyright ©