Breaking News यवतमाळ सामाजिक

*24 तासात 727 जण पॉझेटिव्ह, 824 कोरोनामुक्त*. *इतर महत्व पुर्ण घडामोडी सह*

 

जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह (चंद्रपूर) 15 मृत्यु

यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात गत 24 तासात 727 जण पॉझेटिव्ह तर 824 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नऊ मृत्यु, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एक तर खाजगी रुग्णालयातील पाच मृत्यु आहे. तसेच 15 मृत्युमध्ये एक मृत्यु चंद्रपूर येथील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 7578 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 727 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6851 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4336 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2071 तर गृह विलगीकरणात 2265 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 68948 झाली आहे. 24 तासात 824 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 62962 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1650 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.66 , मृत्युदर 2.49 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 84, 65 वर्षीय पुरुष तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 50 वर्षीय महिला, तालुक्यातील 57, 90 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 62 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील 54 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये पुसद येथील 67 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 34, 78 वर्षीय पुरुष, पुसद येथील 63 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 65 वर्षीय महिला आणि चंद्रपूर येथील 42 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 727 जणांमध्ये 458 पुरुष आणि 269 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 155 रुग्ण पॉझेटिव्ह, वणी 84, दिग्रस 83, दारव्हा 81, पुसद 70, झरीजामणी 54, पांढरकवडा 31, बाभुळगाव 29, राळेगाव 25, नेर 24, मारेगाव 23, महागाव 21, घाटंजी 20, उमरखेड 19, कळंब 11, आर्णि 6 आणि इतर शहरातील 11 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 544816 नमुने पाठविले असून यापैकी 542977 प्राप्त तर 1839 अप्राप्त आहेत. तसेच 474029 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1213 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2244 आहे. यापैकी 1031 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1213 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 327 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 250 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 145 रुग्णांसाठी उपयोगात, 381 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 559 उपयोगात तर 582 बेड शिल्लक आहेत.

_____________________________

शिशुगृहे स्थापन करण्यासंदर्भात त्वरीत नियोजन करा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईचा आढावा

यवतमाळ, दि. 18 : कोरोनाच्या अभुतपूर्व परिस्थितीमुळे बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणा-या संस्थांमधील बालकांची व कोव्हीड – 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या पालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्यात आला आहे. बालकांची काळजी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्यामुळे सर्व सोयीयुक्त शिशुगृहे स्थापन करण्यासंदर्भात महिला व बालविकास विभागाने त्वरीत नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बालसंरक्षण समितीच टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) विशाल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर आदी उपस्थित होते.

बालकांचे दोन्ही पालक कोरोना पॉझेटिव्ह आले असेल आणि रुग्णालयात भरती असेल, अशा बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने महिला व बालविकास विभागाला त्वरीत कळवावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, अशा पालकांची मुले कोणत्या नातेवाईकांकडे ठेवावी, ते आरोग्य यंत्रणेने लिहून घ्यावे. कोव्हीडमुळे पालक गमविलेल्या कुटुंबाची माहिती त्वरीत द्या. जेणेकरून त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देता येईल. तसेच ज्या बालकांना दोन्ही पालक नाहीत, अशांना अनाथ प्रमाणपत्र व योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करा.

बाल न्याय मंडळातील प्रकरणे त्वरीत निकाली काढा. तसेच मुलींच्या शिशुगृहासाठी प्रस्ताव सादर करा. बालकांची काळजी व संरक्षण या संदर्भात आरोग्य विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आदींशी समन्वय ठेवावा. तसेच शिक्षण विभागामार्फत बालकांच्या हक्काविषयी जनजागृती करा. तालुका व ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करून बालकांच्या संरक्षणाबाबत व हक्काबाबत गावागावात माहिती पोहचवा. सद्यस्थितीत जिल्ह्यात 147 बालके बालगृहात आहेत. या सर्व बालकांची जबाबदारी आपल्यावर असून त्यांना योग्य सोयीसुविधा, प्रशिक्षण, योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. बालकांच्या तक्रारी येता कामा नये,असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

बालविवाह प्रतिबंधक कारवाईचा आढावा : जिल्ह्यात जानेवारी ते मे 2021 या कालावधीत आतापर्यंत 20 बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. ही नक्कीच कौतुकास्पद बाब असली तरी बालविवाह होऊ नये, यासाठी दक्ष राहावे. आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होत असेल तर त्याची माहिती ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांनी त्वरीत कळवावी. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर यापुढे बालविवाहाच्या कलमांसोबतच कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भातील कलमे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत 25 हजार रुपये दंड लावावा, असे निर्देश त्यांनी दिले. इतर जिल्ह्यातील बालविवाह आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या जिल्ह्यातील बालविवाह इतर जिल्ह्यात होत असल्याची माहिती मिळताच महिला व बालविकास विभागाने संबंधित जिल्ह्यासोबत संपर्क करून कारवाई करावी. बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी व कोव्हीड संदर्भात दिलेल्या सुचनांचे पालन करा, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

यावेळी कामगार कल्याण अधिकारी सी.बी. काशिद, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुर्यवंशी, विशेष बाल पोलिस पथकाच्या प्रमुख एस.एल. आगाशे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष एस.पी. घोडेस्वार, बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲङ एन.डी. जयवंत, चाईल्ड लाईनचे समन्वयक योगेश मेश्राम आदी उपस्थित होते.

___________________________

जिल्हाधिका-यांची सावरगड, रामपूर, पारवा,

शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

लसीकरणाची पाहणी व यंत्रणेचा आढावा

यवतमाळ, दि. 18 : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तालुका प्रशासनाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सावरगड, रामपूर, पारवा आणि झरीजामणी तालुक्यातील शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जांब येथील आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पांढरकवडा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हाधिका-यांनी सावरगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यानंतर घाटंजी तालुक्यातील रामपूर व पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोनाबाधित रुग्ण व लसीकरण बाबत पाहणी केली. तसेच जांब येथील आश्रम शाळेला भेट देऊन कोव्हीड केअर सेंटरबाबत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. पांढरकवडा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरीत शोध घेऊन त्यांची तपासणी करा. कोव्हीड संदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा. तालुक्यात लसीकरणाची गती वाढवा. 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोज प्राधान्याने देण्यावर भर द्यावा, आदी सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी घाटंजीचे तहसीलदार पूजा मातोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण, पांढरकवडा येथील तहसीलदार सुरेश कवडे, गटविकास अधिकारी सुरेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी संजय मडावी , वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पुराम, डॉ. अश्विनी भोयर, डॉ. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©