यवतमाळ राजकीय

*विविध आरोग्य केंद्राला आमदार प्रा डॉ अशोक उईके यांची भेट*

 

कोव्हिड-19 साथ रोगाच्या संसर्गाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे .प्रशासनातील सर्वच यंत्रणा कामकरित आहे . यातच लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरोणाचा संसर्ग ग्रामीण भागापर्यंत मोठया प्रमाणात पोहोचला आहे. ग्रामीण भागात तापाची साथ सुरू आहे शासनाच्या आरोग्य विभागा शिवाय खाजगी डॉक्टर कडून रुग्ण उपचार करून घेत आहे दिनांक 17 मे 2021सोमवार ला राळेगाव मतदार संघाचे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी राळेगांव तालुक्याचा दौरा करून तीन आरोग्य केंद्राला भेटी दिल्या व आरोग्य सुविधांचा आढावा घेतला कोरोणाच्या संसर्गाने शहर असो की ग्रामीण भाग भयभीत झाला आहे यावर उपाययोजना म्हणून लसीकरण व कोरोना चाचणीला गती देण्याचं काम प्रशासन करीत आहे दुसरी लाट सुरू असताना येणाऱ्या काळात तिसऱ्या लाटेला थांबविण्या संदर्भात आरोग्य विभागाच्या उपाय योजना काय आहे प्रशासनाने गाव पातळीवर गठीत केलेल्या समित्या जनजागृती करते आहे का ?आरोग्याच्या सुविधा संदर्भात माहिती देत आहे का? याकरिता आमदार यांनी आज दिनांक 17 मे 2021 सोमवार ला वरध वाढोणा बाजार धानोरा या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांशी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला उपाययोजना व सुविधेचा आढावा घेतला कुठल्याच रुग्णांची हेळसांड होऊ नये औषध उपचार योग्य वेळी देणे ऑक्सिजनची गरज पडल्यास ग्रामीण रुग्णालयातील सेंटरला घेऊन जाणे अशा सूचना देऊन आपल्या कर्तव्यात कसूर ठेवू नये हा आधार व उपचार देण्याचा काळ असल्याचे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटीच्या वेळेस आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या सोबत भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे भाजपा शहर अध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर उपस्थित होते आढावा संपल्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राळेगाव विधानसभा क्षेत्रासाठी निसर्गत निर्माण करणारे सयंत्र ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर राळेगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपविले यावेळेस उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार रवींद्रकुमार कानडजे डॉक्टर चिमनाणी उपस्थित होते. आमदार यांनी आपल्या आपल्या निधीतून ट्रामा केअर सेंटर येथे पन्नास बेडचे कोव्हिड सेंटर ऑक्सीजन सह सुरू केले आहे याची पाहणी यावेळेस त्यांनी केली .व कुठलीही अडचण असल्यास माहिती देण्याचे सांगीतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©