यवतमाळ सामाजिक

*भारतीय नारी रक्षा संघटनेच्या माध्यमातून संपन्न झाला आदर्श विवाह सोहळा*

 

 

कोरोणा महामारीची खबरदारी घेऊन मास्क व सॅनीटाझरचेही केले वाटप

 

यवतमाळ दि.१६मे:- लोहारा मधील अमोल रामगीर भाटे व वैष्णवी जयवंत छापेकर याचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मात्र दोघांच्या भिन्न जातीचे असल्याने विवाह करण्यास अडचणी येत होत्या. यातुन सामज्यस्याचा मार्ग काढण्यासाठी भारतीय नारी संघटनेचे सदस्य शिवा पुरी यांना याची कल्पना देण्यात आली. त्यांनी लॉकडाऊन मुळे ईतरत्र विवाह करणे शक्य नसल्याने कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा भारतीय नारी रक्षा संघटनेने पुढाकार घेऊन आंतरजातीय आदर्श विवाह लावून देण्यात आला. या प्रसंगी नवदांपत्यास व पाहुणे मंडळीला भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले, हा विवाह सोहळात संघटनेचे अध्यक्ष विनोद दोंदल, सुकांत वंजारी, शिवाजी पुरी, शीतल भाटे, सोनू गिरी, लक्ष्मी पुरी, रूपेश भाटे, चिंडुजी भाटे, धनराज गिरी, कृष्णा राठोड इत्यादी उपस्थित होते,

Copyright ©