Breaking News यवतमाळ सामाजिक

24 तासात 52*9 जण पॉझेटिव्ह, 993 कोरोनामुक्त, 20 मृत्यु * *कृषी निविष्ठांच्या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत*

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर

आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त

  • 24 तासात 529 जण पॉझेटिव्ह, 993 कोरोनामुक्त, 20 मृत्यु

यवतमाळ, दि. 15 : गत पंधरवाड्यात 83 टक्क्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) आता 90 टक्क्यांच्या वर गेला आहे. चालू आठवड्यात सतत सहाव्या दिवशीसुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यासाठी हे नक्कीच दिलासादायक चित्र असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सामुहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 60496 जणांनी कोरोनावर मात केली असून बरे होण्याचे प्रमाण 90.28 टक्के आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 464 ने जास्त आहे. जिल्ह्यात 529 जण पॉझेटिव्ह तर 993 जण कोरोनामुक्त झाले असून 20 जणांचा मृत्यु झाला. दोन मृत्यु जिल्ह्याबाहेरील (नांदेड आणि वाशिम) आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 12 मृत्यु, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खाजगी रुग्णालयातील सहा मृत्यु आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6416 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 529 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5887 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4903 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2280 तर गृह विलगीकरणात 2623 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 67004 झाली आहे. 24 तासात 993 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 60496 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1605 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.80 , मृत्युदर 2.40 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 65 वर्षीय महिला, घाटंजी येथील 60 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 59 वर्षीय पुरुष, वणी येथील 27 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 48 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये वाशिम येथील 60 वर्षीय महिला आणि दारव्हा येथील 69 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 23 वर्षीय महिला, दिग्रस येथील 60 वर्षीय महिला, वणी येथील 70 वर्षीय पुरुष व 71 वर्षीय महिला, पुसद येथील 47 वर्षीय पुरुष आणि किनवट (जि. नांदेड) येथील 73 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 529 जणांमध्ये 324 पुरुष आणि 205 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 83 पॉझेटिव्ह रुग्ण, बाभुळगाव 57, यवतमाळ 52, आर्णि 51, दारव्हा 45, घाटंजी 38, पुसद 31, राळेगाव 31, झरीजामणी 31, कळंब 27, वणी 26, दिग्रस 22, महागाव 19, उमरखेड 10, नेर 4, मारेगाव 1 आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 523559 नमुने पाठविले असून यापैकी 521209 प्राप्त तर 2350 अप्राप्त आहेत. तसेच 454205 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 989 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 989 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 400 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 177 बेड शिल्लक, दहा डीसीएचसीमध्ये एकूण 516 बेडपैकी 167 रुग्णांसाठी उपयोगात, 349 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 636 उपयोगात तर 463 बेड शिल्लक आहेत.

________________________

कृषी निविष्ठांच्या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

कृषी केंद्र ७ ते २

यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 15 मे च्या सकाळी 7 वाजतापासून 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम करण्यात आले आहे. मात्र शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खरीप हंगाम लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, बी-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र यापुढे सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत.

सदर कालावधीत दुकानातील विक्री सोबतच शेतक-यांना व्हॉट्सॲप / मोबाईल कॉलद्वारे माहिती देऊन कृषी निविष्ठा होम डिलीव्हरी (घरपोच विक्री) करण्याच्या अनुषंगाने कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी कार्यवाही करावी. जेणेकरून शेतक-यांच्या सोयीनुसार विक्री व गर्दी टाळण्यास मदत होईल. सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर कोव्हीड त्रिसुत्रींचे पालन होण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुका कृषी अधिकारी (राज्य तसेच जि.प.) यांनी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांच्या आस्थापनाधारकांनी दुकानात नागरिकांची गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त होम डिलीवरीद्वारे वस्तुंचा पुरवठा करावा. यासाठी आस्थापनाधारकांनी स्वत:चा व्हॉट्सॲप क्रमांक दुकानासमोर प्रसिध्द करावा. तसेच ग्राहकांचे व्हॉट्सॲप / मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना घरपोच वस्तुंचा पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून दुकानात प्रत्यक्ष येणा-या ग्राहकांची संख्या कमी होईल.

नगर परिषद / नगर पंचायत व ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले अत्यावश्यक दुकानांच्या आस्थापनाधारकांकडून अत्यावश्यक वस्तुंची विक्री जास्तीत जास्त होम डिलीवरी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. यात ग्रामस्तरीय समित्यांनी व शहरातील प्रभागस्तरीय समित्यांनी आवश्यकतेनुसार अशासकीय संस्थांची मदत घेऊन कार्यवाही करावी. अत्यावश्यक वस्तु / सेवा पुरविणारे आस्थापनाचालक, त्यामधील सर्व कर्मचारी तसेच होम डिलीवरी करणा-या कर्मचा-यांनी लसीकरण करणे अथवा त्यांच्याकडे कोव्हीड चाचणी निगेटिव्ह असल्याबाबतचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोव्हीड चाचणी अहवाल हा अहवालाच्या दिनांकापासून 15 दिवसांपर्यंत वैध राहील. लसीकरण न केल्याचे किंवा वरील मुदतीत निगेटिव्ह अहवाल नसल्यास पहिल्या वेळेस 100 रुपये व त्यानंतर प्रत्येक वेळेस 200 रुपये दंड आकारण्यात येईल.

याव्यतिरिक्त यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमधील सर्व सुचना व आदेश पुर्वीप्रमाणे लागू राहतील. सदर आदेश पुढील आदेशापर्यंत यवतमाळ शहर व जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, कलम 188 व इतर संबंधित नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

Copyright ©