Breaking News यवतमाळ सामाजिक

*24 तासात बाधितांपेक्षा बरे होणारे 521 ने जास्त  710 पॉझेटिव्ह, 1231 कोरोनामुक्त, जिल्ह्याबाहेरील पाच मृत्युसह 27 मृत्यु*

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय

 

 

यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 10 मे रोजी 1010 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 11 मे रोजी 1127 तर बुधवार दि. 12 मे रोजी 1231 जण कोरोनामुक्त झाल्याने गत तीन दिवसांत बरे होणा-यांची संख्या 3368 वर पोहचली. तर गत तीन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या 2301 आहे. वरील तीनही दिवसांत कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 1067 ने जास्त आहे.

 

गत 24 तासात जिल्ह्यात 710 जण पॉझेटिव्ह आले असून 1231 जण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्याबाहेरील पाच मृत्युसह जिल्ह्यात एकूण 27 मृत्युची नोंद झाली. यात दोन नांदेड येथील, दोन वाशिम येथील तर एक मृत्यु चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

 

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 8079 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 710 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7369 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6164 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2511 तर गृह विलगीकरणात 3653 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 65138 झाली आहे. 24 तासात 1231 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 57405 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1569 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.02, मृत्युदर 2.41 आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 81, 66, 71, 50, 50 वर्षीय महिला व 60, 77,70 वर्षीय पुरुष, कळंब शहरातील 80 वर्षीय तर तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 57 वर्षीय महिला, दिग्रस येथील 78 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 85 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 59 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 60, 54 वर्षीय पुरुष, झरीजामणी तालुक्यातील 57 वर्षीय महिला, जिल्ह्याबाहेरील नांदेड येथील 77 वर्षीय पुरुष व 85 वर्षीय महिला, चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष आहे.

 

जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये पांढरकवडा येथील 80 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये वणी येथील 81 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 60 वर्षीय पुरुष आणि वाशिम येथील 52 व 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 

बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 710 जणांमध्ये 447 पुरुष आणि 263 महिला आहेत. यात वणी येथील 77 पॉझेटिव्ह रुग्ण, यवतमाळ 84, पांढरकवडा 91, पुसद 56, घाटंजी 65, दिग्रस 34, झरीजामणी 2, बाभुळगाव 9, दारव्हा 88, नेर 48, आर्णि 17, राळेगाव 38, मारेगाव 25, उमरखेड 34, कळंब 17, महागाव 15 आणि इतर शहरातील 10 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 500279 नमुने पाठविले असून यापैकी 497677 प्राप्त तर 2602 अप्राप्त आहेत. तसेच 432539 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

पुढील आदेशापर्यंत केवळ 45 वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोजसाठी लसी वापरण्याला प्राधान्य : लसीकरण मोहिमेंतर्गत 45 वर्षांवरील बहुतांश नागरिकांचा दुसरा डोज बाकी आहे. त्यामुळे यापुढे आता प्रत्येक केंद्रावर केवळ दुस-या डोजचेच लसीकरण करण्यात येईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड चा दुसरा डोज नागरिकांना देण्याच्या सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. पहिला डोज घेतलेल्या व दुस-या डोजसाठी पात्र असलेल्या नागरिकांची केंद्रनिहाय संख्या तयार करून त्या केंद्रावर दुस-या डोजसाठी लस प्राप्त होईल, याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. तसेच शासनाच्या सुचनेनुसार पुढील आदेशापर्यंत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात येईल. लसीकरण केंद्रावर टोकन पध्दत परिणामकारक पध्दतीने राबवावी. जेणेकरून गर्दी होणार नाही व नियमांचे पालन करून लसीकरण सुरळीत सुरू राहील. उपलब्ध होणा-या लसीचा उपयोग हा दुस-या डोजसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये तसेच यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

 

आतापर्यंत जिल्ह्यात 318516 जणांचे लसीकरण झाले असून मंगळवारी 19487 जणांना लस देण्यात आली. बुधवारी जिल्ह्याला 12500 लस मिळाल्या. जिल्ह्याला लसींचा साठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून यापुढे गतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

 

 

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 742 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 742 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 408 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 169 बेड शिल्लक, सात डीसीएचसीमध्ये एकूण 406 बेडपैकी 169 रुग्णांसाठी उपयोगात, 183 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 709 उपयोगात तर 390 बेड शिल्लक आहेत.

 

________________________

 

‘अर्ज एक… योजना अनेक’ ला 20 मे पर्यंत मुदतवाढ

 

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतक-यांना मिळणार लाभ

 

यवतमाळ, दि. 12 : शेतक-यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करायची असून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 20 मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

 

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षकांतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून यासाठी शेतक-यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 15 मे 2021 पर्यंत अर्ज करावयाचे होते. मात्र आता याला मुदतवाढ मिळाली असून शेतकरी आता 20 मे 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.

 

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमुद करून योजनेसाठी अर्ज करावा. अन्यथा त्यांना अनुदानाचे वितरण होणार नाही.

 

आधार नोंदणी कामासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. तसेच कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर शेतक-यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

 

_______________________

 

रमजान ईदबाबत मार्गदर्शक सुचना

 

यवतमाळ, दि. 12 : कोरानाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्याकरीता खालील मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.

 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करून ‘ब्रेक दि चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईद निमित्ताने स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळे व्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरीता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.

 

कोविड – 19 या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने कलम 144 लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी आहे. संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणूका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थानी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 

वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, चे कलम (51 ते 60) भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

Copyright ©