Breaking News यवतमाळ सामाजिक

*अवघ्या २०व्या वर्षी रितीक ने घेतले राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पेटेंट*. *प्रदुषण न होता विज निर्मिती करता येते*

 

 

 

– को-जनरेशन पावर प्लांट आहे त्याच्या प्रोजेक्टचे नाव

– आमदार येरावार यांच्या सहायतेने झाले पेटेंट

 

यवतमाळ- महाराष्ट्रात सर्वात लहान वयात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पेटेंट मिळविण्याच्या यादीत यवतमाळच्या एका पुत्राचं नाव नोंदविल्या गेले आहे. त्याचं नाव रितीक आनंद अमरावत आहे. तो फक्त २० वर्षाचा असून त्याने प्रदुषण न होता विज निर्मिती करता येते, ही गोष्ट प्रयोगातून शक्य करवून दाखविली आहे. त्याच्या प्रोजेक्टचं नाव को-जनरेशन पावर प्लांट प्रोजेक्ट आहे. त्याने सोलर पावर स्ट्रीम व अॅसिटीलीन गॅस पासून विज निर्मिती करून दाखविली आहे. ही विज निर्मिती करताना कसल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही. हीच बाब या प्रयोगाची जमा बाजू असल्याचे बोलल्या जाते. या प्रमाणे विज निर्मितीचे पेटेंट भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात झालेले आहे. अशा प्रकारचे राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पेटेंट घेणारा तो सर्वात कमी वयाचा ठरला आहे. या पेटेंट साठी काही लाखांचा खर्च होणार होता. पण परिस्थिती सामान्य असल्यामुळे इतकी रक्कम कोठून आणावी हा मोठा यक्ष प्रश्न त्याच्यासोर उभा होता. तरीही त्याने हिम्मत सोडली नाही. त्याने उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश मिश्रा यांना याबाबत मदत करण्याची विनंती केली. त्यांनी त्यास माजी मंत्री व विद्यमान आमदार मदनभाऊ येरावार यांच्याकडे घेवून गेले. मग स्वत: मदनभाऊ यांनी व त्यांच्याच माध्यमाने मदत केल्यामुळे हे पेटेंट रितीकला मिळू शकले आहे, अशी माहिती स्वत: रितीकने दिली आहे. त्याला या प्रकल्पामध्ये यवतमाळचेच सुपुत्र तथा भारताचे महान वैज्ञानिक शास्त्रज्ञ अजिंक्य कोट्टावार चे मार्गदर्शन मिळाले आहे. त्याचप्रमाणे त्याला अमरावती विद्यापिठाचे मेंबर ऑफ बोर्ड,इनोव्हेशन,डा.राजेशकुमार सांभे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले आहे. को- जनरेशन पावर प्लांट ला वर्कींग मॉडेल बनवून तयार केले आहे. या मॉडेलमधून प्रदुषण न होता कमी पैशात विज निर्मीती करता येते, त्यामुळे त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Copyright ©