Breaking News यवतमाळ सामाजिक

*815जण पॉझेटिव्ह, 1010 कोरोनामुक्त,*  *बाहेर जिल्ह्यातील दोन मृत्युसह 23 मृत्यु*

कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जवळपास 200 ने जास्त

 

815जण पॉझेटिव्ह, 1010 कोरोनामुक्त,

 

बाहेर जिल्ह्यातील दोन मृत्युसह 23 मृत्यु

 

यवतमाळ, दि. 10 : जिल्ह्यात गत 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-यांचा आकडा 195 ने जास्त आहे. जिल्ह्यात 815 जण पॉझेटिव्ह आले असून 1010 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील दोन मृत्युसह जिल्ह्यात एकूण 23 मृत्युची नोंद झाली. यातील वैद्यकीय महाविद्यालयात 17, खाजगी कोव्हीड रुग्णालयात चार आणि डीसीएचसीमध्ये दोन मृत्यु झाले.

 

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 6589 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 815 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5774 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7088 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2689 तर गृह विलगीकरणात 4399 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 63652 झाली आहे. 24 तासात 1010 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 55047 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1517 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.14, मृत्युदर 2.38 आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 65 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 65, 62, 68 वर्षीय पुरुष व 62, 68 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, वणी येथील 60 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 84 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, राळेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 52 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 75 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, माहूर (जि. नांदेड) येथील 58 वर्षीय पुरुष आणि अमरावती येथील 65 वर्षीय वर्षीय पुरुष आहे.

 

जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये महागाव तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, झरी तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये वणी येथील 79 वर्षीय पुरुष, कळंब येथील 60 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 65 वर्षीय पुरुष आणि महागाव येथील 66 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 

सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 815 जणांमध्ये 492 पुरुष आणि 323 महिला आहेत. यात वणी येथील 143 पॉझेटिव्ह रुग्ण, दारव्हा 112, यवतमाळ 73, दिग्रस 62, झरीजामणी 49, बाभुळगाव 47, पुसद 46, मारेगाव 46, पांढरकवडा 43, नेर 42, राळेगाव 41, आर्णि 36, घाटंजी 24, महागाव 24, कळंब 18, उमरखेड 6 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 484579 नमुने पाठविले असून यापैकी 482662 प्राप्त तर 1917 अप्राप्त आहेत. तसेच 419010 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

 

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 737 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 29 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 737 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 426 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 151 बेड शिल्लक, सात डीसीएचसीमध्ये एकूण 386 बेडपैकी 147 रुग्णांसाठी उपयोगात, 239 बेड शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 717 उपयोगात तर 347 बेड शिल्लक आहेत.

 

____________&&____

 

टंचाई निवारणासाठी गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी येडगे

 

टँकरची संख्या कमी करण्याचे निर्देश

 

यवतमाळ, दि. 10 : सन 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात टँकरची संख्या जास्त आहे. टँकर आणि विहीर अधिग्रहणाची आवश्यकताच पडू नये, असे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे टंचाई निवारणार्थ गांभिर्याने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई व जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता राहूल जाधव आदी उपस्थित होते.

 

मागील दोन्ही वर्षी सारखाच पाऊस झाला असतांना यावर्षी टँकरची संख्या जास्त का, असे विचारून जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा योजनेतून पाण्याचे नियोजन करा. तसेच चालू असलेले टँकर कमी किंवा बंद करण्यासाठी प्रयत्न करा. पाणी उपलब्ध आहे, पण ते वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी येऊ देऊ नका. यवतमाळ न.प. क्षेत्रात नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे. तसेच अमृत योजनेच्या कामाची डेडलाईन 1 जुलैपर्यंत ठरविण्यात आली आहे. तोपर्यंत अमृत योजनेचे काम टेस्टिंगसह पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी सतत पाठपुरावा करा. यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाच्या नेहमी संपर्कात राहा, अशा सुचना त्यांनी केल्या.

 

तसेच नळयोजना विशेष दुरुस्तीची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. माळपठारावर किती टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरची संख्या कधीपर्यंत कमी होईल, याबाबतही त्यांनी विचारणा केली. सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 गावांत 26 टँकर सुरू असून 115 गावात 109 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे यांनी बैठकीत दिली.

 

_________________

 

बालविवाहाबाबत प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 10 : बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार बालकाचे वय 21 वर्ष व बालिकेचे वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी वयामध्ये लग्न झाल्यास तो बालविवाह होतो. कोरोना महामारीच्या काळात समाजात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहे. कोविड -19 टाळेबंदी काळात लपून-छपून विवाह होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अक्षय तृतीया हा विवाहासाठी शुभमुहूर्त असल्याने जास्तीत जास्त विवाह आयोजित असून त्यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

त्यामुळे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर होत असलेल्या विवाहात लक्ष घालून बालविवाह होत असल्यास कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. तेव्हा आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास याबाबत माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, दुसरा माळा, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, चाईल्ड लाईन क्रमांक 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यवतमाळ तसेच स्थानिक प्रशासनास कळवावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©