Breaking News यवतमाळ सामाजिक

*24 तासात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 1032 जण पॉझेटिव्ह, 895 कोरोनामुक्त, 36 मृत्यु* *एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ*

24 तासात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

1032 जण पॉझेटिव्ह, 895 कोरोनामुक्त, 36 मृत्यु

यवतमाळ, दि. 9 : जिल्ह्यात गत 24 तासात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 1032 जण पॉझेटिव्ह आणि 895 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच एकूण 36 मृत्युची नोंद झाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21, खाजगी कोव्हीड रुग्णालयात 11 आणि डीसीएचसीमध्ये चार मृत्यु झाले. एक मृत्यु बाहेर जिल्ह्यातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 7506 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1032 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7306 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2711 तर गृह विलगीकरणात 4595 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 62837 झाली आहे. 24 तासात 895 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 54037 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1494 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.15 , मृत्युदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 72, 81 वर्षीय पुरुष व 60, 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय महिला, मारेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 22 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, वणी येथील 55 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 28, 70 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील 55, 65 वर्षीय पुरुष, नेर येथील 57 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष व 81 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, झरीजामणी तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष आणि वर्धा येथील 65 वर्षीय महिला आहे.

जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये महागाव तालुक्यातील 65 वर्षीय महिला, पुसद येथील 70 वर्षीय पुरुष, वणी येथील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 33, 48 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, दारव्हा येथील 46 वर्षीय पुरुष, झरीजामणी येथील 75 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 35, 79 वर्षीय पुरुष व 42 वर्षीय महिला, वणी येथील 53 वर्षीय महिला, नेर येथील 71 वर्षीय महिला आणि पुसद येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1032 जणांमध्ये 634 पुरुष आणि 398 महिला आहेत. यात वणी येथील 166 पॉझेटिव्ह रुग्ण, यवतमाळ 159, पांढरकवडा 125, दारव्हा 105, दिग्रस 86, मारेगाव 69, पुसद 67, नेर 56, राळेगाव 56, बाभुळगाव 36, कळंब 31, महागाव 28, आर्णि 16, उमरखेड 13, घाटंजी 8 आणि इतर शहरातील 14 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 477913 नमुने पाठविले असून यापैकी 476073 प्राप्त तर 1840 अप्राप्त आहेत. तसेच 413236 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 733 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 29 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 733 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 428 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 149 बेड शिल्लक, सहा डीसीएचसीमध्ये एकूण 360 बेडपैकी 136 रुग्णांसाठी उपयोगात, 224 बेड शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 704 उपयोगात तर 360 बेड शिल्लक आहेत.

________&&_________

एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक

यवतमाळ, दि. 9 : शेतक-यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता 15 मे पर्यंत अर्ज करायचा आहे.

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षकांतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून यासाठी शेतक-यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 15 मे 2021 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमुद करून योजनेसाठी अर्ज करावा. अन्यथा त्यांना अनुदानाचे वितरण होणार नाही.

आधार नोंदणी कामासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. तसेच कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर शेतक-यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©