Breaking News यवतमाळ सामाजिक

*841 जण पॉझेटिव्ह, 910 कोरोनामुक्त, 20 मृत्यु 6718 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*. *उदया पासून कडकं लॉक डाऊन दुकाने चालु ठेवल्यास ५० हजार रुपये दंड*

24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे जास्त

841 जण पॉझेटिव्ह, 910 कोरोनामुक्त, 20 मृत्यु

6718 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात 841 जण पॉझेटिव्ह आणि 910 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच एकूण 20 मृत्युची नोंद झाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 16, खाजगी कोव्हीड रुग्णालयात दोन आणि डीसीएचसीमधील दोन मृत्युंचा समावेश आहे. एक मृत्यु बाहेर जिल्ह्यातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 7559 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 841 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6718 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7205 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2685 तर गृह विलगीकरणात 4520 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 61805 झाली आहे. 24 तासात 910 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 53142 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1458 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.12 , मृत्युदर 2.36 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 75, 68 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 44 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 48 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 25, 66 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 55 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 70, 51 वर्षीय पुरुष, नांदेड येथील 52 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 72, 69 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 60 वर्षीय महिला, कळंब येथील 74 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये महागाव तालुक्यातील 65 वर्षीय व राळेगाव येथील 65 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 50, 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 841 जणांमध्ये 512 पुरुष आणि 329 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 126 पॉझेटिव्ह रुग्ण, दारव्हा 90, पुसद 85, दिग्रस 80, झरी 76, वणी 68, पांढरकवडा 57, घाटंजी 45, आर्णि 42, नेर 39, बाभुळगाव 37, मारेगाव 33, कळंब 21, महागाव 16, उमरखेड 13, राळेगाव 7 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 471233 नमुने पाठविले असून यापैकी 468566 प्राप्त तर 2667 अप्राप्त आहेत. तसेच 406761 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 763 बेड उपलब्ध : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 29 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 763 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 365 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 212 बेड शिल्लक, सहा डीसीएचसीमध्ये एकूण 360 बेडपैकी 172 रुग्णांसाठी उपयोगात, 188 बेड शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 701 उपयोगात तर 363 बेड शिल्लक आहेत.

________&_______________

….तर दुकानांवर होणार 50 हजार रुपयांचा दंड

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवीन मार्गदर्शक सुचना

यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 9 मे च्या सकाळी 7 वाजतापासून 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यासदंर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश पारित केले आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू असल्यास तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनंतरही नियमांचा भंग करून उघडले असल्यास त्यांच्यावर 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक, वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहील. सर्व किराणा दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी खाद्यपदार्थांची दुकाने (ज्यात चिकन, मटन, मच्छी, अंड्यांची दुकाने) सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू राहील. आठवडी बाजार, पारंपरिक भाजीबाजाराची दुकाने, रस्त्यावर थांबून भाजीपाला व फळे विक्री करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तथापी सोसायटी, कॉलनी व गल्लीमध्ये जाऊन भाजीपाला व फळे विक्री करण्यास सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत मुभा राहील.

कृषी सेवा केंद्र, बी-बियाणे, खते, किटकनाशक विक्री केंद्र सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत प्रत्यक्ष सुरू राहील. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू असल्यास तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेनंतरही नियमांचा भंग करून उघडले असल्यास त्यांच्यावर 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच सदर आस्थापना कोव्हीड – 19 आजाराची अधिसुचना अंमलात असेपर्यंत बंद करून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. लग्न समारंभ घरगुती स्वरुपात 25 लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेत पार पाडावे. संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांच्याकडून लग्नाची रितसर परवानगी घ्यावी लागेल. नियम व अटी शर्तीचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सर्व खाजगी, शासकीय / निमशासकीय कार्यालये बंद राहतील. अत्यावश्यक सेवेची कार्यालये (उदा. महसूल, आरोग्य, नगर परिषद / नगर पंचायत, विद्युत, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत) सुरू राहतील. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना बंदी राहील. कार्यालयात अभ्यागत आढळून आल्यास त्याच्यावर स्थानिक प्रशासनाकडून 200 रुपये दंड आकारण्यात येईल व संबंधित कार्यालय प्रमुखावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या, तक्रारी, निवेदने ई-मेल, व्हॉट्सॲप, दूरध्वनीने घेण्याचे नियोजन करावे. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय विनाकारण घराबाहेर पडणा-यांकडून 200 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच अशा लोकांची पथकाकडून कोव्हीड चाचणी करून अहवाल पॉझेटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तिची रवानगी सीसीसी मध्ये करण्यात येईल व त्यासाठीचा येणारा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल.

याशिवाय ब्रेक द चेन अंतर्गत 22 एप्रिल 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये वरील बाबींच्या सुधारणा करण्यात आल्या असून उर्वरीत मार्गदर्शक सुचना व घालून देण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. सदर आदेश हे 9 मे च्या सकाळी 7 वाजतापासून 15 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.

सदर आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

Copyright ©