यवतमाळ सामाजिक

गावठी दारू गाळप करणाऱ्यावर वडगांव जंगल पोलिसांची धाड.

——————————————-
दारू साहित्यासह १.१४००० रुपये ताब्यात
****************************
यवतमाळ- जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चापडोह धरण परिसरात गावठी दारू गाळप करण्यात येत असल्याची टिप वडगांव जंगल पोलिसांना मिळाली त्यावरून त्यांनी धाड टाकली.यात दारू, मोहफुलाचा दारूचा सडवा व मुद्देमालासह घटना स्थळावरून आरोपीस ताब्यात घेतले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने अनेक निर्बंध घालून शासन मान्य परवाने धारक दारूची दुकाने बंद ठेवली. याचाच फायदा घेत गावठी दारू गाळप करून ते विकायचे व चांगला पैसा कमविण्याच्या उद्देशातून वडगांव जंगल पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चापडोह धरण परिसरात हा प्रकार चालू असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. यावरून दिनांक ६ मे ला दुपारी २ ते ३ च्या सुमारास धाड घालण्यात आली. यात १५० टीनाचे पिपे,२ लोखंडी ड्रम मध्ये एकूण १६० लिटर सडवा मोहमाच अंदाजे किंमत ८०.००० रुपये तसेच ४० लिटर गावठी हातभट्टी दारू याची अंदाजे किंमत ४००० रुपये दोन मोटर सायकल एक विवो कंपनी चा मोबाईल असे एकूण एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यातील आरोपी संजय महादेव जीवने वय ४७ वर्ष वार्ड क्रं.२० बुध्द विहार समोर भोसा यवतमाळ व गुंजन संतोष यादव वय २२ वर्ष पवार पुरा शारदा चौक यवतमाळ यांना ताब्यात घेतले. सदर घटनेची सरकारी फिर्याद पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोगलाजी तोगरवाड यांनी दिली आहे. यावरून मुंबई दारूबंदी अॅक्ट व कोरोना काळातील दारू गाळप यावरील गुन्हे दाखल केल्या गेले आहे. यावेळी वडगांव जंगल चे ठाणेदार पवन राठोड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगरवाड, पोलीस हवालदार हरिभाऊ ठाकरे, पोलिस नायक निलकमल भोसले, अक्षय डोंगरे व मागीलाल चव्हाण हे सहभागी होवून कारवाई केली. पुढील तपास ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनात वडगांव जंगल पोलिस करीत आहे. या घटनेने अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Copyright ©