यवतमाळ सामाजिक

बालरोग संघटना व राठोड हॉस्पिटलद्वारा मोफत रोगनिदान शिबीर

यवतमाळ- भारतीय बालरोग संघटना यवतमाळ शाखा व डॉ राठोड हॉस्पिटलच्यावतीने गरजू व गरीब रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा मिळावी या उद्देशाने रोगनिदान व कार्ड वाटप शिबिर येत्या 19 जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा तळणी (अकोलबाजार जवळ) येथे आयोजित केले आहे। या वेळी देण्यात येणाऱ्या कार्ड वर वर्षभर मोफत तपासणी यवतमाळ शहरातील विविध रुग्णालयात केली जाणार असल्याची माहिती डॉ. वीरेंद्र राठोड यांनी दिली। या शिबिराचे उदघाटन आर्णी गट विकास अधिकारी आनंद लोकरे तर तहसीलदार धीरज स्थूल अध्यक्षस्थानी राहतील। ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, तळणीच्या सरपंच कुसुम लोणकर, डॉ संजय माळवी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे। या शिबिरात बालरोग तज्ञ डॉ वीरेंद्र राठोड, सारंग तारक, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ अर्चना राठोड, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ महेश चव्हाण, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ भारत राठोड, नेत्र तज्ञ डॉ गुप्ता, दंतरोग तज्ज्ञ डॉ प्रशांत तामगाडगे, जनरल सर्जन निशांत चव्हाण, नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ प्रशांत पवार, मेंदूरोग तज्ञ डॉ हर्षल राठोड, होमिओपॅथी तज्ञ डॉ निकिता चव्हाण, जनरल फिजिशियन डॉ दिनेश राठोड, डॉ संजय माळवी, डॉ मनीष राठोड व मानसिकरोग तज्ञ डॉ श्रीकांत मेश्राम तपासणी करणार असून तळणी येथील मधुकरराव चव्हाण यांचे कडून मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे। सदर आयोजन पिताश्री आर टी राठोड चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रेरणा बहुउद्देशीय संस्था यवतमाळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। ग्रामवासीयांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। सदर आयोजनाची हे 9 वे वर्ष असून निवडलेल्या दत्तक गावातील नागरिकांची वर्षभर मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते। ही तपासणी यवतमाळ येथील डॉ रमेश पाटील (त्वचारोग), डॉ परिता नाथवणी व डॉ राहुल डूबेवार (नेत्र), डॉ भारत राठोड (हृदयरोग व मधुमेह), डॉ महेश चव्हाण (अस्थीरोग), डॉ श्रीकांत मेश्राम (मानसिकरोग), डॉ प्रशांत पवार (नाक कान। घसा), डॉ निशांत चव्हाण (सर्जन), डॉ निकिता चव्हाण (होमिओपॅथी), डॉ सचिन राठोड (मूळव्याध व भगंदर), डॉ प्रशांत तांमगाडगे (दंत) यांचे रुग्णालयात वर्षभर तळणीवासीयांसाठी मोफत राहणार आहे।

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©