यवतमाळ सामाजिक

वाढोणा बाजार येथे निर्जंतुकिरणासाठी केल्या गेली फवारणी

———————————————
कोरोनासह साथरोगावर नियंत्रणाचा प्रयत्न
****************************
राळेगाव(प्रतिनिधी) सध्याच्या काळात जिल्ह्यासह खेडेगावात सुध्दा कोरोना या आजाराने ग्रासले आहे. त्याचसोबत अनेक साथीच्याही रोगाने डोके वर काढल्याने स्थानिक प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेत गाव निर्जंतुकिकरण करण्याचे ठरवून वाढोणा बाजार गावात निर्जंतुकिकरन फवारणी केली.
कोरोना या महामारीने अख्या जगात थैमान घातले असतानाच याचे लोन खेडे गावा पर्यंत पोहचले. त्यातच वातावरणाच्या सततच्या बदलावामुळे ताप, सर्दी, खोकला अश्या विविध साथ रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून डासांचाही प्रमाण वाढल्याने याला काही अंशी अडकाव व्हावा हा मानस पुढे करून वाढोणा बाजार या गावात ही फवारणी करण्यात आली. यात नक्कीच डासांचे प्रमाण कमी होवून ईतर आजारावर नियंत्रण मिळेल अशी आशा गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात होते. या निर्जंतुकिकरण्याच्या फवारणीने गावकरी समाधानही व्यक्त करतांना दिसत होते. कोरोना या आजाराने ग्रामीण जनता भयभीत झाली असून वाढत्या रुग्ण संख्येने जनजीवन विस्कळित झाले आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुतीस पात्र ठरला असून काही प्रमाणात का होईना पण वाढत्या डासांचा नायनाट होवून काई प्रमाणात आजारांना लगाम बसेल असे नागरिकांतून वर्तविले असून हिच फवारणी वारंवार करण्यात यावी त्याच सोबत सार्वजनिक ठिकाणचे स्रोत असलेल्या ठिकाणी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे अशीही मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©