Breaking News यवतमाळ सामाजिक

24 तासात 1399 पॉझेटिव्ह, 1161 कोरोनामुक्त जिल्ह्याबाहेरील तीन मृत्युसह एकूण 28 मृत्यु

 

यवतमाळ, दि. 3 : गत 24 तासात जिल्ह्यात 1399 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1161 जण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्याबाहेरील तीन मृत्युसह एकूण 28 मृत्यु झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एक आणि खाजगी रुग्णालयात सहा मृत्यु झाले.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 7097 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1399 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1161 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6701 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2523 तर गृह विलगीकरणात 4178 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 56159 झाली आहे. 24 तासात 1161 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 48104 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1354 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.88 असून मृत्युदर 2.41 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 59, 59, 81 वर्षीय पुरुष आणि 54, 65 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, दारव्हा येथील 74 वर्षीय पुरुष व 50, 69 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 65 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 72 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 55 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 45, 51 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 28 वर्षीय पुरुष, राळेगाव येथील 42 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 50 वर्षीय पुरुष आणि धामणगाव (जि. अमरावती) येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये वणी येथील 54 वर्षीय महिला असून खाजगी रुग्णालयात महागाव येथील 61 वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील 51 वर्षीय पुरुष, पुसद येथील 53 वर्षीय महिला, उमरखेड येथील 70 वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर येथील 65 वर्षीय पुरुष व 57 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1399 जणांमध्ये 875 पुरुष आणि 524 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 419 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 362, पांढरकवडा 109, दिग्रस 100, घाटंजी 100, दारव्हा 74, नेर 43, पुसद 38, कळंब 29, राळेगाव 28, उमरखेड 27, मारेगाव 23, आर्णि 16, झरीजामणी 6, महागाव 2, बाभुळगाव 1 आणि इतर शहरातील 22 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 436025 नमुने पाठविले असून यापैकी 429230 प्राप्त तर 6795 अप्राप्त आहेत. तसेच 373071 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 577 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 0 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सहा डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 360 बेडपैकी 174 रुग्णांसाठी उपयोगात, 186 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 34 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2723 बेडपैकी 1219 उपयोगात, 1505 शिल्लक तर 27 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 965 बेडपैकी 667 उपयोगात आणि 298 बेड शिल्लक आहेत.

__________________

18 ते 44 वयोगटातील 910 जणांना लस

Ø जिल्ह्यात लसीकरणासाठी पाच केंद्र

यवतमाळ, दि. 2 : महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण पाच केंद्र आहे. यात यवतमाळ शहरात पाटीपूरा आणि लोहारा येथे तर उर्वरीत तीन दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील 910 जणांना लस देण्यात आली असून सर्वाधिक 190 जणांचे लसीकरण पाटीपुरा येथील केंद्रावर करण्यात आले. यानंतर पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 187 जण, यवतमाळ शहरातील लोहारा येथील केंद्रावर 185 जण, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात 181 जण आणि पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 167 जणांनी लस घेतली.

लसीकरणासाठी नोंदणी करण्याची पध्दत : 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम selfregistration.cowin.gov.in किंवा CoWIN Application किंवा Arogya Setu Application ॲपवर / पोर्टलवर नोंदणी करावी. यानंतर फोटो ओळखपत्राचा उल्लेख करावा. (फोटो ओळखपत्रामध्ये आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, पॅन कार्ड आदींचा समावेश). यानंतर लसीकरण केंद्र निवडावे व निवड केलेल्या केंद्रावरच दिलेल्या ठराविक वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून रांगेत नंबर लावावा व आपल्या क्रमांकानुसार लस घ्यावी. लसीकरण झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर संदेश प्राप्त होईल. दुस-या डोजसाठी कालावधी पूर्ण झाल्यानंतर अशीच प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©