यवतमाळ सामाजिक

कोविड-19 लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना डावलून कर्मचाऱ्याच्या 22 वर्षीय मुलाला दिली लस

 

18 ते 44 वर्ष पर्यंतच्या नागरिकांना लस देण्याचे आदेश नसतांना , कर्मचाऱ्यांच्या 22 वर्षीय मुलाला टोकन नसताना पण लस देण्यात येते

दिग्रस

ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे covid-19 लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. व नागरिका कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नागरिक टोकन घेण्‍यासाठी शिस्तबध्द पद्धतीने लाईन लाऊन टोकन मिळविण्यासाठी धडपड करीत आहे.या लाईन मध्ये 45 ते 100 वर्षा पर्यंत चे नागरिक लाईन मध्ये उभे राहून टोकन पद्धतीने लसीकरण करवून घेत आहे.मात्र आरोग्य विभागातीलच काही कर्मचारी आपल्या परिचयाचे किवा नातलग लोक असल्यास त्यांना वेगळ्या मार्गाने टोकन देऊन तात्काळ लस देत असल्याचे आरोप होत आहे.गेल्या आठवड्यात लसीकरण केंद्रावर असा प्रकार घडला होता त्या प्रकरणाला एक आठवडा होत नाही.आज 1 मार्च महाराष्ट्र दिनी आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.45 वर्ष वयोगटातील नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून टोकन घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने लस घेण्यासाठी लाईन मध्ये तासोनतास उभे राहून क्रमवारीने नोंद करून लस घेत होते.अश्यातच एक कर्मचारी आपल्या 22 वर्षीय मुलाला घेऊन आले  व त्या मुलाला डॉ कडून लस पण देण्यात आली.हा सर्व प्रकार लाईन मध्ये उभे असलेल्या नागरिकांन समोर होत असल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला असता डॉ काडून त्या नागरिकांनाच  सुनावण्यात आल्याची सर्वत्र चर्चा  आहे. झालेल्या प्रकारची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य ती चॉकशी करून दोषींवर कारवाई होईल का या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे
———— ——— —————-
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे कुठलेही आदेश नसतांना कर्मचाऱ्याचा मुलगा आहे म्हणून लस देण्यात
येते मग ईतर सर्व सामान्य नागरिक covid-19 लस पासून वंचित का?

45 वर्षा खालील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये,18 ते 44 वर्ष वयोगटासाठी लसीकरण सुरू होताच प्रसार माध्यमातून सूचित करण्यात येईल.आज 22 वर्षीय मुलाला नजर चुकीने लस देण्यात आली
डॉ शेरे (दिग्रस लसीकरण केंद्र प्रमुख)

Copyright ©