यवतमाळ सामाजिक

कोरोना बाहेर फिरू देईना विद्युत कंपनी घरात राहू देईना !, केवळ ग्रामीण जनतेनी मरण यातणाच भोगाव्या का?

 

ग्रामीण परिसरात कोरोणाचां वाढता प्रादर्भाव असून विद्युत कंपनी ची मनमानी वाढत आहे रात्री दिवसा अनियमित विद्युत पुरवठा सुरू आहे कधीच पूर्णतः विद्युत पुरवठा रहात नाही काहींच्या घरी अडचण आल्यास कुणीही दखल घेत नाही लाईन मन सुद्धा येत नसल्याने गावातील विद्युत पुरवठा अनियमित झाला आहे समस्त ग्राहक त्रस्त झाले आहे ना शेतकऱ्यांना या विद्युत कंपनी कडून समाधान मिळत आहे ना ग्राहकांना , शासनाचां कोणत्याही प्रकारे विद्युत कंपनी वर अंकुश राहिला नाही त्या मुळे सर्व सामाण्याची पिवळणुक मोठ्या प्रमाणात सुरू आहे अव्वा च्या सव्वा देयके देण्यात येते देयके कमी करण्यासाठी अधिकारी तयार नसते बिल थकीत झाले की विद्युत पुरवठा बंद करण्यात येते ज्याणा मीटरच नाही अशा ग्राहकांना 10 हजारच्या वरुन देयक त्या मुळे विद्युत कंपनीचे डोके जाग्यावर आहे का? असा सवाल करण्यात येत आहे विद्युत देयका मध्ये नको ते अधिभार लाऊन हुकुमशाही सारखी वसुली केल्या जात आहे त्या मुळे सर्व सामान्य जनता विद्युत कंपनी ला त्रस्त झाली आहे शासन नको त्या मार्गाने सर्वसामान्यांची खुले आम् लूट करत आहे लॉक डाऊन असताना गरिबाच्या हाताल काम नाही दोन वेळचे अन्न मिळवीन्याचा प्रश्न असताना दुसरी कडे विद्युत कंपनी विद्युत पुरवठा बंद करतो दोन वेळचे पोट भरणे कठीण झाले तर देयके कुठून भरावे असा प्रश्न ग्रामीण भागात निर्माण झाला आहे शासनाचे लक्ष फक्त शहराकडेच आहे ग्रामीण भागास वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र दिसून येत आहे ग्रामीण जनतेचे काय हाल सुरू आहे या कडे एकही मंत्री फिरकला नाही ही बाब वाखाण्या जोगी आहे आज ग्रामीण भागात कोरोणाचा उद्रेक पहावयास मिळत आहे परंतु ग्रामीण भागात शाशनानी कोणतीच सोय सुविधा अजून पर्यंत केलेली दिसून आली नाहि ग्रामीण भागात माणसेच असतात याची शासनाला विसर तर पडली नसेल ना !

Copyright ©