Breaking News विदर्भ सामाजिक

बुद्धिस्ट लॉ(BUDDHIST LAW) लिहिणाऱ्या अँड.शताब्दी खैरे यांचे कोरोनाने निधन– मूर्तिजापुर तालुक्यात शोककळा.

 

मूर्तिजापूर येथील श्री.गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते,समाज क्रांती आघाडीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे समाज क्रांती आघाडीचे संस्थापक प्रा. मुकुंद खैरे यांची कन्या आणि उच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून आपल्या कार्याने छाप पाडणा-या कु.शताब्दी खैरे(एल.एल.एम.गोल्ड मँडेलीस्ट) यांचे अकोल्यात कोरोना वर उपचार सुरू असताना दि.२ एप्रिल २०२१ रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता  मूर्तिजापुरात येऊन धडकताच सर्वत्र खळबळ उडाली.अत्यंत हुशार असलेल्या अँड. शताब्दी खैरे यांच्या मृत्यूची बातमी ही थरकाप उडवून देणारी ठरली.सर्वसामान्य विश्वसनीय कार्यकर्ता सर्वांना सोडून निघून गेल्याने आंबेडकरी चळवळीतील अनेकांना धक्का बसला.मागील आठवड्यातच त्यांच्या आईचे कोरोनाने निधन झाले होते.अँड.कु.शताब्दी खैरे नागपूर येथील उच्च न्यायालयात वकील म्हणून मागील चार वर्षापासून कार्यरत होते.सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत धडपड करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित झाले होते.त्यांनी आपल्या समाजासाठी बुद्धिष्ट लाँ(BUDDHIST LAW) असे  कायद्याचे पुस्तक लिहिले.आपल्या समाजासाठी अंमल करण्यासाठी केंद्र सरकारकडे निवेदने दिली. आंबेडकरी चळवळीमध्ये प्रा.मुकुंद खैरे यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून दहा-बारा वर्षांपासून त्यांच्या प्रत्येक कार्यात कार्यक्रमात आणि देशातील दिल्ली नागपुर मुंबई अकोला व इतर राज्य तसेच गाजियाबाद हैदराबाद येथे सहभागी होऊन हिरीरीने भाग घेतला.अँड.कु. शताब्दी खैरे वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी कोरोना महामारीमध्ये बळी पडल्याने समाजावर, तरुण पिढीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोक कलर पसरली आहे.

Copyright ©