विदर्भ सामाजिक

गणेश हरणे चा प्रामाणिकपणा, सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र परत केले

 

जगात कोविड चे थैमान सुरू असताना अनेकांचे प्रयत्न  सध्या स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला वातचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीतसुद्धा आजच्या या महामारीच्या  काळात आजही प्रामाणिकपणा व इमानदारवृत्ती असल्याचे प्रचिती अकोला येथे दिसून आली.

गणेश हरणे रा. गजानन नगर डबकी रोड अकोला याला सापडलेले एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र मयूर घटोळकर रा.लहान उमरी अकोला याला परत केले.

घटना अशी आहे की अकोला येथील लहान उमरी  रहिवासी मयूर घटोळकर यांच्या आईंची तब्येत खराब  झाल्यामुळे त्यांना त्यांचा मुलगा मयूर याने अकोला येथील ओझोन हॉस्पिटल येथे आणले असता, घाईगडबडीत त्यांच्या गळ्यातील अंदाजे एक ते सव्वा लाख किमतीची सोन्याचे मंगळसूत्र हरवले.सदर मंगळसूत्र ओझोन हॉस्पिटल च्या समोर चहा विकणारा  सुरेश  हरणे या गरीब व्यक्तीचा मुलगा  गणेश हरणे याला सापडले. सदर बाब त्याने त्याचे वडील सुरेश हरणे यांना सांगितले, सुरेश हरणे  यांना अंदाज होता की,ज्यांचे मंगळसूत्र हरविले आहे अशी व्यक्ती नक्कीच तेथे मंगळसूत्र शोधण्यासाठी येतील.अन्यथा हे मंगळसूत्र पोलीस स्टेशन ला जमा करून टाकू. कारण कोणाच्या दुसऱ्याची वस्तू किंवा संपत्ती आपल्याला नको आहे.अशा वृत्तीचे व स्वभावाचे  सुरेश हरणे हे  आहेत. काही वेळेनंतर एक गरीब कुटुंबातील  मुलगा मयूर घटोळकर अतिशय चिंतीत अवस्थेत तेथे आला. व ओझोन हॉस्पिटल येथे शोधा शोध करतांना गणेश हरणे याला दिसला, त्याला विचारले की काय शोधत आहे तेव्हा त्या गरीब मुलाने सांगितले की माझी आईला ओझोन हॉस्पिटल मध्ये आणले असता तिच्या गळ्यातील एक ते सव्वा लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र हरविले. आम्ही खूप गरीब आहोत.आईची प्रकृती ठीक नाही. यात मंगळसूत्र हरविल्याने आमचे सर्व कुटुंब चिंतीत,दुःखी व हवालदिल झालेलो आहे. तेव्हा त्या हवालदिल झालेल्या मयूरला गणेश ने दिलासा देत म्हटले काळजी करू नका. तुझ्या आईचे मंगळसूत्र मला सापडलेले आहे.आम्ही या मंगळसूत्राच्या मालकाचीच वाट बघत होतो. हे ऐकताच त्या गरीब मयूरच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.  शेवटी ओझोन हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या व स्टाफ च्या उपस्थितीत मयूर घटोळकरची ओळख पटवून, गणेश हरणे व सुरेश हरणे यांनी सोन्याचे मंगळसूत्र परत केले. गणेश सुरेश हरणे च्या इमानदार व माणुसकीच्या वागणूकमुळे अतिशय गरीब कुटंबतील  गणेश हरणे यांचे ओझोन हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ ने कौतुक केले.सर्व स्तरातून गणेश हरणे व सुरेश हरणे या गरीब चहा विक्रेत्याच्या इमानदार,

आणि माणुसकीच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Copyright ©