यवतमाळ सामाजिक

जोडमोहा येथील अवैध व्यवसाईकांना बिटजमदारांचे पाठबळ

जोडमोहा बनले दारू व्यवसाईकांचे माहेर घर

जोडमोहा येथे कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सर्रास सुरू असल्याचे चिंताजनक चित्र दिसून येत आहे.एकीकडे कोरोना आजाराने जोडमोहा येथील नागरिक मृत्यूच्या दारात उभे आहे तर दुसरी कडे आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वच दारूचे लायसन्स धारक दुकान बंद आहेत मात्र जोडमोहा येथे जास्त भावाने अवैध दारू विक्री करून ग्रामस्थांची लूट करीत असून गावातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदी लागू असताना सर्वांचे व्यवहार ठप्प झाले आहे मात्र ग्रामीण बिट जमदारांना जातो हजारो रुपये हप्ता त्यामुळे पोलीस प्रशासनाची वचक नसल्यामुळे अवैध दारू विकणाऱ्या ची संख्या वाढत चालली आहे. या ठिकाणी अवैध देशी दारूचा साठा व मोहफुलाचे दारू मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने केला जात असून गावात खुलेआम दारूची विक्री होत असून जोडमोहा गावात दारूचा महापूर आला आहे. यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.मात्र, ग्रामीण ठाणेदार या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे का ? असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
आजूबाजूच्या खेड्यांतील व्यवसाईक जोडमोहा येथून दारू त्यांच्या गावी नेत असल्याने. अवैध दारू विकणाऱ्या ची संख्या वाढत आहे आजूबाजूच्या खेड्यांतीलदारू शौकिनांचे जोडमोहा गावात दाखल होऊन येथेच दारू ढोसून आपल्या गावाकडे पलायन करीत असल्याने सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावात अवैध देशी दारू साठा कोठून उपलब्ध होत आहे, वरिष्ठांनी अवैध देशी दारू विक्रीला त्वरित आळा घालावा, अन्यथा या ठिकाणी मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.६० रुपयांची बाटली १०० रुपयांत संचारबंदी मुळे ग्रामीण भागात दारूचा महापूर आला आहे. शहरी भागातील पाऊले ग्रामीणकडे वळत असून या संधीचा फायदा घेत ६० रुपयांची बाटली थेट १०० ते १२० रुपयांत विक्री केली जात आहे. संचारबंदी कायदा असूनही येथे आधीपेक्षाही अधिक अवैध दारू विक्री सुरू असून निराशा व्यक्त होत आहे. यामुळे पोलीस निरीक्षक समोर मोठे आव्हान आहे कमी वेळामध्ये जास्त पैसा मिळत असल्याने अनेक महाशय या व्यवसायात गुंतले आहेत. अवैध दारु विरुद्ध वरिष्ठांची भुमिका काय आहे याकडे जोडमोहा ग्रामस्थ लक्ष लागले आहे.

Copyright ©