यवतमाळ सामाजिक

किडींच्या प्रादुर्भावामुळे भुईमुग पिकात सोडली जनावरे.

 

आर्णी तालुक्यात भुईमूग उत्पादक संकटात.

उन्हाळी हंगामात घेतले जाणा-या भुईमूग पीक संकटात सापडले आहे . यावर्षी आर्णी तालुक्यात भुईमूग पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र सुरुवातीपासूनच पांढरी माशी मावा तुडतुडे फुलकिडे आणि बुरशीजन्य रोगांमुळे या पिकाला फलधारणा असणाऱ्या शेंगा लागल्या नाहीत . नापिकी होत असल्याने भुईमूग उत्पादक शेतक-यांनी अखेर हिरव्या भुईमूगाच्या पिकात जनावरे चरायला सोडली आहे. आर्णी तालुक्यातील तेंडोळी येथील दयाराम राठोड परशुराम राठोड यांच्या पाच एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या भुईमूगाच्या शेतात बक-या चरायला सोडल्याचे हे चित्र पाहायला मिळाले. भुईमूग पिकासाठी लागवड खर्च हा इतर पिकांच्या तुलनेत अधिक असतो. महागडे बीयाणे रासायनिक खते कीडनाशके मजुरी असा हा खर्च येतो. यंदाच्या हंगामात भुईमूग पिकांवर किड नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला. अशातच आता शेंगा लागल्या नसल्याने उत्पादन खर्च ही भरुन निघणार नाही. किड नियंत्रण करणे शक्य झाले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे . #####################
कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांत रोष.

उन्हाळी हंगामातील पिके किडींनी ग्रासली असताना पिकांच्या किड नियंत्रण करण्यासाठी कोणतेही ठोस उपाययोजना कुषी विभागाने सुचविल्या नाहीत. नुकत्याच केव्हीके च्या शास्त्रज्ञांनी आणि कुषी विभागाचे अधिकारी यांनी बांधावर जाऊन पिक पाहणी केली मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे हेच मार्गदर्शन आधी झाले असते तर कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती. ऐनवेळी उपाययोजना केल्या जात नाहीत आणि आता वरातीमागून घोडे अशी कुषी विभागाची कार्यप्रणाली आहे.यामुळे हतबल शेतकरी रोष व्यक्त करीत आहे.

Copyright ©