यवतमाळ सामाजिक

घाटंजी गटविकास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अलर्जी

——————————————-
कोरोना काळात जनतेशी देणे घेणे नाही.
****************************
आपली कार्यप्रणाली लपविण्यासाठी पं. स. चे दरवाजे बंद.
****************************
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) कोरोना महामारी सतत वाढती रुग्ण संख्या व गावागावात तापाची साथरोग यामुळे गावागावात भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार संचार करीत आहे. यात ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या असताना घाटंजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी देऊन आपल्या सोबत कर्मचारी व ग्रामसेवकांना ही पूर्णता मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. त्या कार्यालयात उपस्थित झाल्यास तर कोरणा वर मात करण्यासाठी जनतेत जनजागृती करण्याएवजी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी पंचायत समितीचे सर्व दरवाजे बंद करून कोणाची संपर्क न करता जनतेला पंचायत समिती मध्ये प्रवेश नाकारल्या जात असल्याचा गंभीर प्रकार घाटंजी पंचायत समिती कार्यालयात घडत आहे.
गावागावात आपत्ती असताना सुद्धा आपत्ती व्यवस्थापन समिती मधील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक हे सर्व दिसेनासे झाले आहे. यांची व्यथा मांडण्यात अथवा त्यांची शोधा शोध करण्यासाठी गटविकास अधिकारी यांचेकडे गेल्यास पंचायत समिती चे सर्व बाजूंनी दरवाजे बंद मग आता भेटायचे कोणाला हा मोठा पेज जनतेपुढे उभा आहे. पंचायत समिती मध्ये प्रवेश करण्याआधी कोरोना चाचणी करा असे फलक असले तरी या ठिकाणी कोरोना चाचणीची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. जो बाहेरून चाचणी करून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाही प्रवेश नाकारल्या जाते. मग प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे कारण काय? शासन परिपत्रकात अभ्यागतांना प्रवेश देऊ नये असे असले तरी जनतेची कामे करू नये असे कुठेही नमूद नाही. येथे कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेवर काय कारवाई केल्या जात आहे. असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहे. केवळ जनतेला वाऱ्यावर सोडून शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन स्वतःचाच विचार केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत काही लोकप्रतिनिधींना विचारले असता येथील अधिकाऱ्यांची मनोपल्ली वाढीस जाऊन शासनाचे निर्बंध पुढे करून त्याचा चांगलाच फायदा घेत कामचुकारपणा मुख्यालयाला दांडी मारणे हा प्रकार चालला आहे. त्यामुळे आम्हालाही काम करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे उत्तर दिल्या जात आहे येथिल कार्यरत विद्यमान गटविकास अधिकारी रुजू झाल्यापासून अपवादात्मक ग्रामपंचायतीला भेटी दिल्या असेल त्यांना ग्रामीण जनतेच्या कोणत्याही समस्येची अथवा कोरोना या महामारीवर प्रतिबंध यावर काहीच देणे-घेणे नसल्याचे यावरून दिसून येते. त्याशिवाय गावस्तरावर रोजगार हमी चे कामे रखडले आहे. ग्रामीण जनतेला रोजगार नाही, घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते अडकून पडले आहे. कोविड प्रतिबंध शिबिराला भेट सुद्धा देण्याचे सौजन्य दाखवीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सामान्य जनते सोबत व्यवस्थित बोलण्याचे मुद्दाम करून टाळण्याचे प्रकार बहुतांशी वेळा घडले आहे. ते यवतमाळ येथे वास्तव्यास राहत असून शासकीय वाहनाने ये-जा करतात. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या कोरोना महामारी च्या गंभीर काळात येथील प्रकार बघून या पंचायत समितीच्या कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करून तालुक्यातील जनतेला न्याय देण्याची मागणी सर्वत्र तर स्तरातून होत आहे.

Copyright ©