Breaking News यवतमाळ

863 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 880 कोरोनामुक्त 30 मृत्यु

 

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात गत 24 तासात 863 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 880 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 30 मृत्यु झाले. यातील 24 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, दोन मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 5401 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 863 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4538 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7111 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2623 तर गृह विलगीकरणात 4488 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50995 झाली आहे. 24 तासात 880 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 42672 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1212 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.58 असून मृत्युदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 60,57, 54, 63, वर्षीय पुरुष व 51, 70, 68 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 35, 52 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 80 वर्षीय पुरुष, वणी येथील 50 वर्षीय पुरुष व 65, 70 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष, राळेगाव येथील 40 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिला, दिग्रस येथील 55 वर्षीय महिला, केळापूर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 42 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 55 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेले दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 45 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये दारव्हा येथील 67 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 65 वर्षीय महिला, पुसद येथील 70 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील 72 वर्षीय पुरुष आहे.

बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 863 जणांमध्ये 525 पुरुष आणि 338 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 163 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 150, पांढरकवडा 104, घाटंजी 69, दारव्हा 66, उमरखेड 57, आर्णि 53, दिग्रस 48, पुसद 38, नेर 36, महागाव 34, मारेगाव 15, झरीजामणी 14, बाभुळगाव 2, राळेगाव 2, कळंब 1 आणि इतर शहरातील 11 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 405436 नमुने पाठविले असून यापैकी 399221 प्राप्त तर 6215 अप्राप्त आहेत. तसेच 348226 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

ऑक्सीजन व रेमडेसीवीर पुरवठाबाबत नियंत्रण कक्ष कार्यान्वित : जिल्ह्यात ऑक्सीजन व रेमडेसीवीरचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत असला तरी काही खाजगी कोव्हीड रुग्णालयासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे खाजगी कोव्हीड रुग्णालयात ऑक्सीजन, रेमडेसीवीर पुरवठा तसेच बेड व्यवस्थापनासंदर्भात व इतर काही तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या सनियंत्रणाखाली 10 ते 12 जण कक्षात 24 बाय 7 कार्यरत आहेत. यासाठी 07232-240720, 240844 आणि 255077 हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वरील बाबींबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे

 

पालकमंत्री यांचा 29 व 30 एप्रिल रोजीचा यवतमाळ जिल्हा दौरा

यवतमाळ, दि. 28 : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

गुरुवार दिनांक 29 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.15 वाजता नागपूर विमानतळ येथून करंजी ता. पांढरकवडाकडे प्रयाण. सायंकाळी 4.45 ते 5 वाजता करंजी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट व पाहणी. पांढरकवडाकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 ते 5.35 वाजता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय भेट व पाहणी, मारेगावकडे प्रयाण, सायंकाळी 6.10 ते 6.25 वाजता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय भेट व पाहणी. वणीकडे प्रयाण. सायंकाळी 6.50 ते 7.15 वाजता वणी येथील ग्रामीण रुग्णालय भेट व पाहणी. यवतमाळकडे प्रयाण. रात्री 21.15 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9.20 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून स्त्री रुग्णालयकडे प्रयाण. सकाळी 9.30 ते 10 वाजता स्त्री रुग्णालय भेट व पाहणी. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळकडे प्रयाण. सकाळी 10 ते 11 वाजता खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक. सकाळी 11 ते 12 वाजता जलजीवन मिशन आराखडा मंजुरी संदर्भात बैठक, दुपारी 12 ते 1 वाजता यवतमाळ जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक. दुपारी 1 ते 2 वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कामांचा आढावा बैठक. दुपारी 2 ते 3 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ राखीव. दुपारी 3 ते 4 वाजता जिल्हा नियोजन समिती व खनिज विकास निधी अंतर्गत आरोग्य विभागाच्या नियमित योजना व कोविड नियंत्रण उपाययोजना बैठक. दुपारी 4 ते 5 वाजता मनरेगा आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.

 

मद्यविक्री संदर्भात प्रशासनाकडून सूचना जारी

यवतमाळ, दि. 28 : राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विविध बाबींकरीता प्रतिबंध व अतिरिक्त सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील ठोक व किरकोळ विक्रीच्या (एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4. एफएल-बिआर-2,सिएल-2,सिएल-3) अनुज्ञप्त्या बंद करण्यात आल्या आहेत. अवर सचिव यांनी मद्य विक्री अनुज्ञप्ती नमुना एफएल – 2, फॉर्म ई, फॉर्म ई -2, एफएलडब्लू – 2 या अनुज्ञप्तीतुन घरपोच (होम डिलीवरी) या प्रकारे मद्य विक्री करता येईल. त्याचप्रमाणे सीएल – 3 अनुज्ञप्तीतुन फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच या प्रकाराने मद्यविक्री करता येईल याबाबत सूचना दिल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्याकरीता कोविड -19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता, साथरोग नियंत्रण अधिनियम -1897 च्या कलम 2 अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या सर्व संबंधीत तरतुदीसह जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहे. मद्यविक्री अनुज्ञप्ती नमुना एफएल -2 व एफएल -3 या अनुज्ञप्तीतुन घरपोच याप्रकारे मद्यविक्री करता येईल. त्याचप्रमाणे सीएल-3 अनुज्ञप्तीतुन फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच या प्रकाराने मद्यविक्री करता येईल. अनुज्ञप्तीधारकास कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्रीची दुकाने उघडून टेक अवे किंवा पार्सल पध्दतीने दुकानातून ग्राहकास मद्यविक्री करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास मद्य विक्रीच्या दुकानास भेट देता येणार नाही. अशा मद्याची विक्रीकरीता घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाईल, त्या व्यक्ती मास्कचा वापर व वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करतील याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी अनुज्ञप्तीधारक यांची राहील.

किरकोळ मद्य विक्रीस परवानगी दिल्यामुळे ठोक मद्य अनुज्ञप्तीधारक यांना (सीएल-3, एफएल -1) या आदेशात नमुद केलेल्या विहीत वेळेत त्यांचे अनुज्ञप्तीचे व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील एफएल -4 व एफएल / बिआर -2 अनुज्ञप्ती कुठल्याही प्रकारे मद्य विक्रीकरीता सुरु राहणार नाही. उपरोक्त नमुद सर्व घाऊक व किरकोळ अनुज्ञप्तीची वेळ सकाळी 7 ते 11 पर्यंत राहील. कोविड -19 च्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील व त्यासंदर्भात यानंतर देण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्वे वरील सर्व अनुज्ञप्तीधारकांना लागू राहील.

सदर कालावधीत वरील निर्देशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था यांचेवर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता यामधील कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल. सदर आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात यापुर्वीच जवळपास दहा बालविवाह थांबविण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. पुन्हा एकदा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे एक बालविवाह थांबविण्यात आला आहे.

कळंब तालुक्यातील खैरी येथे मामाकडे वास्तव्याला असलेल्या व मुळच्या सावंगी (पोड) जिल्हा वर्धा येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गोदणी जिल्हा यवतमाळ येथील व्यक्तीसोबत 29 एप्रिल 2021 रोजी विवाह होणार होता. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास लेखी माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी खैरी गावातील पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या मदतीने मुलीच्या नातेवाईकांनी भेट घेऊन मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समुपदेशन केले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगितले.

मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दखल पात्र गुन्हा आहे. याबाबत माहिती देण्यात आली. मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यावर मुलीचे लग्न करण्याबाबत लेखी जवाब पदाधिकाऱ्यांना दिला व मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लग्न न करण्याचे ठरविले.

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व कळंबचे ठाणेदार अजीत राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. बाल विवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्ता आकाश बुर्रेवार, अंगणवाडी सेविका जोत्स्ना राऊत, पोलीस पाटील ज्योती चव्हाण, आशा स्वयंसेविका वनिता वरझडकर, वसंत चव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित पार पडली.

बालविवाह ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. 18 वर्षाखालील मुलगी व 21 वर्षाखालील मुलगा यांचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हा एक दखलपात्र गुन्हा असून यामध्ये 2 वर्ष कारावास व एक लाख दंडाची तरतुद आहे. त्यामुळे बालविवाह बाबत नागरिकांनी अतिदक्ष रहावे, तसेच बालविवाह बाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ अथवा चाईल्डलाईन 1098 यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले आहे.

०००००००

 

ओळखपत्रासाठी तृतीयपंथीयांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 28 : संयुक्त सचिव सामाजिक न्याय आणि अधिकारीता विभाग मंत्रालय, नवी दिल्ली योजनेंतर्गत ऑनलाईन ओळखपत्र देण्याबाबत या वेबसाईटद्वारे trasgender.dosje.gov.in/Admin या वेबसाईटवर आपला अर्ज अपलोड करावा व आपली परीपूर्ण माहिती भरण्यात यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

Copyright ©