यवतमाळ सामाजिक

ब्रेक दि चेन मध्ये गावातील शाळा प्रभावी उपाय

राळेगाव तालुका पत्रकार संघटनेकडून तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना सूचक निवेदन

राळेगाव (तालुका प्रतिनिधी) दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही ग्रामीण भागात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव रुग्ण असल्यास समूह संसर्ग होण्याची दाट शक्यता बळावली आहे. गाव पातळीवरील अॅक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची आरटीपि सीआर चाचणी केल्यानंतरही रिपोर्ट येईपर्यंत गावात राहतो. त्याचा त्या दरम्यान चा गावात आलेला संपर्क त्यामुळे सहाजिकच तो अनेकांना बाधित करतो ब्रेक दि चेन चा कितीही गाजावाजा केला तरी प्रत्यक्षात हा उपक्रम ग्रामीण भागासाठी सफसेल चुकीचा ठरत असून अशा रुग्णांना गावातीलच शाळेत ठेवून त्यांचेवर नियंत्रण ठेवणे प्रभावी उपाय ठरेल असे सूचक लेखी निवेदन राळेगाव तालुका पत्रकार संघटनेने राळेगाव तहसिलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना पाठविले आहे.
ग्रामीण भागातील जनतेचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने गावातील प्रत्येक नागरिकांचा कोणाशी ना कोणाशी संपर्क येतोच यामध्ये कोरोना चे लक्षण असणारे सुद्धा नागरिक एकमेकात मिसळतात त्याशिवाय कोरणा पॉझिटिव आल्यास आपल्याला जिल्हा रुग्णालयात नेतात आणि तिथे मृत्यू होतो. अशी गैरसमजमय भीती निर्माण झाली आहे. त्याशिवाय आर्थिक निपन्नाव्यवस्थेत दडले आहे. त्यामुळे औषधोपचार करण्यापेक्षा आजार अंगावर काढण्याचे प्रमाण वाढलेले सऱ्हास खेडेगावात दिसून येत आहे. या सारासार बाबी कोरोना संक्रमण रोकथाम उपाय योजनेमध्ये अडथळा ठरत असल्याने राळेगाव पत्रकार संघटनेने अतिशय चिकित्सक अभ्यास करून प्रभावी बिनखर्चिक उपाय ठरवून राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे लेखी निवेदन पाठवून जन उपयोगी व ब्रेक दि चेन चा प्रभावी उपाय म्हणून या मागणीचे आपल्या स्तरावरून अंमलबजावणी करावी व कोरोना ची साखळी तोडावी अशीही मागणी निवेदनातून केली आहे. भारत हा खेडेगावाचा देश असून कोरोनाचा मोठा धोका खेडे गावांनाच असल्याचेही त्या निवेदनात नमूद असून सध्या गाव पातळीवरील शाळा बंद असल्याने आज मीतिला प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध आहेतच आणि रुग्णांचे रिपोर्ट प्राप्त होईपर्यंत आपल्याच गावाच्या शाळेत विलगीकरण केल्यास त्यांच्या मनात भीती राहणार नसल्याचे नमूद आहे. अश्या अनेक मागण्या नमूद असलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले असून यावर राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्यातील खेडेगावातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहे.

Copyright ©