यवतमाळ सामाजिक

कराचा भरणा करणाऱ्यांचे घाटंजी न. प. कडून सत्कार

सर्वात जास्त कर भरणारे राम खांडरे यांचा सत्कार

सतत एक वर्षापासून कोरोना या महामारी ने जनता जीवन जगण्यापासून तर मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. यातच स्थानिक नगर परिषदेकडून आवश्यक सुविधा पुरविणे हे सुद्धा प्राप्त करातूनच पुरवावे लागते मात्र अशा बिकट वेळी जो अपेक्षित कर प्राप्त झाला नसल्याने नगरपरिषदेला अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. अश्यातच घाटजी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम खांडरे यांना विद्यमान अध्यक्ष नयनाताई शैलेश ठाकूर व उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी कराचा भरणा करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावरून त्यांनी सन 2020-2021 या आर्थिक वर्षाचा नगर परिषद मध्ये सर्वात जास्त कराचा भरणा केला. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांनी सर्वात जास्त कराचा भरणा केल्याने घाटंजी नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी अभिनंदन करून त्यांचा बांधकाम सभापती विक्रमसिंह अशोकसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राम खांडरे यांनी नगर परिषदेचा कराचा भरणा करून इतर नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अश्या परिस्थितीत नगर परिषदेला खांडरे यांनी मोलाचे सहकार्य केल्यावरून अध्यक्ष नयनाताई शैलेश ठाकूर व उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या आयोजित सत्कार कार्यक्रमांमध्ये कर विभाग प्रमुख प्रकाश घोति शिक्षण विभागातील संजय दीडशे, शंकर नेहारे, जाधव व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यापुढेही याच प्रमाणे समस्त नागरिकांनी कराचा भरणा करून नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्षा, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी व बांधकाम सभापती यांनी केले आहे.

Copyright ©