यवतमाळ सामाजिक

डेडिकेटेड कोव्हिड सेंटर व ऑक्सिजन प्लँट ची आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या कडून पाहणी

संपूर्ण देशात कोव्हिड-19 या साथ रोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे .महाराष्ट्रात याने थैमान घातले आहे .याला आळा बसावा या दृष्टीने तालुका स्तरावरच आरोग्याच्या सुविधा पूर्ण करण्या साठी राळेगांव मतदार संघाचे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी उपविभागीय कार्यालय राळेगांव येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन केले होते . सर्वपक्षीय सभेत राळेगांव मतदार संघासाठी एक कोटी रुपयांचा निधी आरोग्याच्या सोई सुविधे साठी देण्याचेजाहिर केले होते .राळेगांव येथे ट्रामा केअर सेंटर मध्ये पन्नास बेड चे ऑक्सिजनच्या सोई सुविधेसह कोव्हिड सेंटर उभारण्याचे आश्वासन दिले या साठी लागणारा निधी तातडीने वळता केला .यातच यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे यात ग्रामीण रुग्णालय राळेगांव समाविष्ट आहे .या प्लँट ला ही मंजुरात मिळाली आहे.दिनांक २७एप्रिल मंगळवार ला आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी ४:३०च्या दरम्यान राळेगांव येथे येऊन डेडिकेटेड कोव्हिड सेंटर व ऑक्सिजन प्लँट ची पाहणी केली .या बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली पन्नास बेड चे डेडीकेटेड कोव्हिड सेंटर येत्या दोन दिवसात जनतेच्या सेवेत असणार आहे असे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी सांगितले सर्वपक्षीय सभेत दिलेले आश्वासन या निमित्याने पूर्ण झाले आहे. कोव्हिड सेंटर व ऑक्सिजन प्लँट चे राहिलेले काम त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या याच प्रमाणे आरोग्याच्या संदर्भात तालुक्यातील कुठल्याच गावातून तक्रार येणार नाही याची दक्षता सर्वांनी घेण्याचे सांगितले .यावेळेस आमदार प्रा डॉ अशोक यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे , वैदयकीय अधिकारी डॉ प्रकाश चिमनानी प्र तहसीलदार बदकी डॉ कुणाल भोयर उपस्थित होते.

Copyright ©