यवतमाळ सामाजिक

शिवणी येथे कोविड लसीकरण व RT-PCR महाअभियान सुरू जि.प.सदस्या सरीताताई मोहनराव जाधव यांनी केले शुभारंभ

 

तालुक्यातील शिवणी जि.प.सर्कल अंतर्गत लसीकरण महाअभियान शिवणी येथे सुरू करण्यात आले आहे. सर्व प्रथम उपकेंद्र मोवाडा येथे लसीकरण कॅम्प सुरू केले. आता शिवणी येथे लसीकरण कॅम्प सुरू करण्यात आले आहे या उपक्रमात शिवणी परीसरातील सर्व गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा म्हणून सौ.सरीताताई मोहनराव जाधव स्वतः पुढे येवून कोविडशिल्ड लसीकरण व RT-PCR तपासनी करून घेतल्या. आणि कोरोना लसी बद्दल ज्या काही खोट्या अफवा पसरविल्या जात आहे, त्याला न घाबरता 45 वर्षावरील सर्व नागरिक व महीला भगिनींनी लसीकरण करून कोरोनाला हरविण्यासाठी लस घेवून या लढाईत सज्ज व्हावे हे वास्तव त्यांनी दाखवून दिले. शिवणी येथील प्रा.आ.केंद्र निर्लेखित झाल्यामुळे येथे लसीकरण शिबीर सुरू करण्यासाठी टाळाटाळ होत असतांनी मुख्यकार्यकारी अधिकारी. डॉ.पांचाळ साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार साहेब यांचे कड़े जि. प. सदस्या सरिता जाधव यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर मा.सिईओ. मा.डिएचओ साहेब यानी जि.प.शाळेत लसीकरणाला मान्यता दिली या शिबीराचे संपुर्ण नियोजन डॉ.शैलेश ढेंगे, यांचे सह कर्मचारी कौस्तुभ घाडके, वाईकर, वातिले, सोनाली दांडेकर, शिल्पा वाघमारे सिस्टर यांनी केले. तर शिवणी येथील प्रतिष्ठीत भाजपा व्हीजेएनटी. आघडीचे जिल्हाध्यक्ष मोहण जाधव, सोसायटी संचालक बळीराम पवार, उपसरपंच नरेंद्र चव्हाण, ग्रा.प.सदस्या सौ.चंद्रकलाबाई सुरेश पवार, बाळू जाधव, डॉ.सुरेश पवार, अतिश देशमुख, प्रविण राठोड़, राजू राठोड, रामधन राठोड विश्वनाथ जाधव, विलास पवार राहूल पवार यांचेसह ग्रा.पं.कर्मचारी, आंगनवाडी सेविका, मदतनीस, जेष्ठ नागरीक यांनी लसीकरण अभियानात आपली उपस्थीती दर्शवून लसीकरण करून घेतले. लसीकरण महाअभियान नियमित सुरू राहणार असून शिवणी सर्कल व घाटंजी तालूक्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मोहण जाधव यांनी केले आहे.

Copyright ©