Breaking News यवतमाळ

जिल्ह्यात 1323 जण पॉझेटिव्ह ; 803 कोरोनामुक्त जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह एकूण 45 मृत्यु

जिल्ह्यातील विविध कोव्हीड रुग्णालयात 1496 बेड उपलब्ध

आयसीयु 14, ऑक्सीजन 138 तर नॉर्मल बेड 1344 शिल्लक

जिल्हा प्रशासनाच्यावतीने 280 बेडचे अतिरिक्त नियोजन

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराला जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून बरे होण्याचे प्रमाणसुध्दा वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटल आणि 33 कोव्हीड केअर सेंटरमार्फत रुग्णांवर उपचार सुरू आहे. बेडच्या उपलब्धतेबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून अद्यापही जिल्ह्यातील विविध कोव्हीड रुग्णालयात 1496 बेड उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिरिक्त 280 बेडचे नियोजन केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ताण कमी करणे आणि जिल्ह्यातील सर्व भागात उपचाराची सुविधा निर्माण करणे या उद्देशाने जिल्ह्यात एकूण 33 कोव्हीड केअर सेंटर, तसेच पुसद, पांढरकवडा, दारव्हा आणि यवतमाळ येथे आयुर्वेदिक कॉलेज असे एकूण चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर, 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व 577 (आयसीयु बेड – 80, ऑक्सीजन बेड – 410 आणि नॉर्मल बेड – 87) बेड रुग्णांच्या उपयोगात आहे. तर जिल्ह्यातील 24 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 206 आयसीयु बेड असून यापैकी 192 बेडवर रुग्ण भरती आहेत. तर 14 आयसीयु बेड शिल्लक आहेत. यात वणी येथील लोहिया हॉस्पीटलमध्ये 3 आयसीयु बेड, दिग्रस येथील डॉ. संदीप दुधे हॉस्पीटल मध्ये 3, वणी येथील सुगम हॉस्पीटलमध्ये 2 आणि पुसद येथील आयकॉन हॉस्पीटल, वडते हॉस्पीटल, यवतमाळातील संजीवन हॉस्पीटल, धवणे हॉस्पीटल, तावडे हॉस्पीटल आणि उमरखेड येथील निर्विघ्न हॉस्पीटल व क्रीटीकेअर हॉस्पीटलमध्ये प्रत्येक एक याप्रकारे 14 बेडची उपलब्धता आहे.

जिल्ह्यातील 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटल तसेच पुसद, दारव्हा आणि यवतमाळ येथील आयुर्वेदिक कॉलेज येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 138 ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत. यात खाजगी रुग्णालयात 111 तर डीसीएचसी मध्ये 27 ऑक्सीजन बेडची उपलब्धता आहे. खाजगी रुग्णालयात शिल्लक असलेल्या ऑक्सीजन बेडमध्ये वणी येथील लोढा हॉस्पीटलमध्ये 44 बेड, दिग्रस येथील डॉ. संदीप दुधे हॉस्पीटलमध्ये 12, पुसद येथील आयकॉन हॉस्पीटलमध्ये 22, वणी येथील सुगम हॉस्पीटलमध्ये 19, यवतमाळातील क्रिटीकेअर हॉस्पीटलमध्ये 7, उमरखेड येथील निर्विघ्न हॉस्पीटल व क्रीटीकेअर हॉस्पीटलमध्ये 3, यवतमाळ येथील कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये 2 आणि यवतमाळ येथील धवणे हॉस्पीटल व पुसद येथील चव्हाण हॉस्पीटलमध्ये प्रत्येकी 1 ऑक्सीजन बेड शिल्लक आहे. तसेच डीसीएचसी मध्ये शिल्लक असलेल्या 27 ऑक्सीजन बेडमध्ये पुसद येथे 13, दारव्हा येथे 10 आणि यवतमाळ येथील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये 4 ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत.

तर जिल्ह्यातील सर्व 33 सीसीसी (यवतमाळ येथे 10, आर्णि, झरी, दिग्रस, नेर, महागाव, कळंब, वणी, दारव्हा येथे प्रत्येकी 2 सीसीसी, उमरखेड, राळेगाव, घाटंजी, मारेगाव, बाभुळगाव, पुसद, पांढरकवडा येथे प्रत्येकी 1 सीसीसी), 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटल आणि 4 डीसीएचसीमध्ये एकूण 1344 नॉर्मल बेड उपलब्ध आहे. यात सीसीसीमध्ये 1232 बेड, खाजगी कोव्हीड रुग्णालयात 66 आणि डीसीएचसीमध्ये 46 बेडचा समावेश आहे.

तसेच जिल्हा प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 ऑक्सीजन बेड व 10 व्हेंटीलेटर, स्त्री रुग्णालय यवतमाळ येथे 100 बेड, उमरखेड ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सीजन बेडची व्यवस्था, वणी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सीजन बेडचे डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे.

आयसीयु बेड

ऑक्सीजन बेड

नॉर्मल बेड

एकूण

उपयोगात

शिल्लक

एकूण

उपयोगात

शिल्लक

एकूण

उपयोगात

शिल्लक

1 जीएमसी

80

80

0

410

410

0

87

87

0

4 डीसीएचसी

97

70

27

143

97

46

33 सीसीसी

2573

1341

1232

24 खाजगी

206

192

14

454

343

111

145

79

66

जिल्ह्यात 1323 जण पॉझेटिव्ह ; 803 कोरोनामुक्त

जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह एकूण 45 मृत्यु

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात गत 24 तासात 1323 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 803 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 45 मृत्यु झाले. यातील 33 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, चार मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर आठ मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. सोमवारी झालेल्या एकूण 45 मृत्युपैकी एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 6154 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1323 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4831 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6703 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2731 तर गृह विलगीकरणात 3972 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 49132 झाली आहे. 24 तासात 803 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 41272 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1157 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.50 असून मृत्युदर 2.35 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 25, 46, 56, 42, 78, 65, 54, 63 वर्षीय पुरुष आणि 44 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 36, 30, 63, 69, 42, 56 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, नेर येथील 35 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 39 वर्षीय पुरुष व 66 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 36 व 68 वर्षीय महिला, दारव्हा येथील 55 वर्षीय पुरुष, वणी येथील 61, 76 वर्षीय पुरुष व 50, 52 वर्षीय महिला, राळेगाव येथील 63 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, झरी तालुक्यातील 85 वर्षीय महिला, पुसद येथील 60 वर्षीय पुरुष आणि आदिलाबाद (आंध्र प्रदेश) येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये दारव्हा येथील 45 वर्षीय महिला, उमरखेड येथील 36 वर्षीय पुरुष, महागाव येथील 70 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 53, 45, 36 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65, 67, 45 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला आणि वणी येथील 42 वर्षीय महिला आहे.

सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1323 जणांमध्ये 744 पुरुष आणि 579 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 280 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 186, दिग्रस 157, दारव्हा 139, पांढरकवडा 133, वणी 70, बाभुळगाव 69, उमरखेड 61, झरी 52, कळंब 46, महागाव 38, आर्णि 38, घाटंजी 22, मारेगाव 13, नेर 6, राळेगाव 6, आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 393080 नमुने पाठविले असून यापैकी 388208 प्राप्त तर 4872 अप्राप्त आहेत. तसेच 339076 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

वाघाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा

यवतमाळ, दि. 26 : पांढरकवडा वनविभागांतर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वन कक्षमध्ये वाघ मृत झाल्याची रविवारी सकाळी अंदाजे 10.30 वाजता माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक (वन्यजीव), पांढरकवडा, मुकुटबन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांचे प्रतिनिधी तसेच मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विरानी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, दिल्ली यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट दिली व वस्तुस्थितीचे पाहणी केली.

सदर जागेची तपासणी केली असता वाघ नाल्याला लागून असलेल्या गृहेत मृत अवस्थेत दिसून आला. गळ्यात तारेचा फास अडकल्याचे, अणुकूचीदार हत्याराने मारल्याचे आणि गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जाळलेल्या लाकडांवरून निदर्शनास आले. सदर वाघ मादी असून अंदाजे 4 वर्ष वयाची असण्याची शक्यता आहे. वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडल्याचेही आढळून आले आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, डॉ. अरुण जाधव, डॉ. एस. एस. चव्हाण, डॉ. डी. जी. जाधव व डॉ. व्ही.सी. जागडे यांचेमार्फत मोक्यावर शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्युचे नेमके कारण कळेल. सदर प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा जारी करून गुन्ह्याचा तपास सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा), पांढरकवडा हे करीत आहेत.

Copyright ©