यवतमाळ सामाजिक

नायब तहसीलदार राठोड यांनी सेतू चालकांना फटकारले

स्थानिक तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र चालक सर्व सामान्य लोकांकडून प्रमाणापेक्षा जास्त शुल्क आकारात असल्याच्या तक्रारी निवासी नायब तहसीलदार दिलीप राठोड यांच्या कानावर आल्या. त्यांनी लगेच सेतू केंद्रात येऊन त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. व जास्तीचे पैसे परत करायला लावल्याने लोकात समाधान व्यक्त होत आहे.

सदर समाधान केंद्रातून ऑनलाईन उत्पन्न, रहिवाशी, वय, राष्ट्रीय, अधिवास, जात, नॉन क्लिमि्लेअर दाखला, पत, जेष्ठ नागरिक, शेतकरी, अल्प भूधारक, भूमिहीन शेतमजूर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व सर्वसाधारण प्रमाणपत्र त्याच प्रमाणे नवीन रेशन कार्ड काढणे, नाव समाविष्ट करणे अथवा कमी करणे, 33 टक्के महिला आरक्षण दाखला, संजय गांधी, इंदिरा गांधी श्रावण बाळ निराधार योजना, अर्ज शुल्क, कलर प्रिंट व स्कॅनिंग प्रत आदी कामे केल्या जातात. त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले ठराविक शुल्क आकारले जाते. मात्र स्थानिक सेतू सुविधा केंद्रामध्ये त्यापेक्षा जास्त शुल्क आकारण्यात आल्याने काही लोकांनी निवासी नायब तहसीलदार दिलीप राठोड यांचेकडे शाब्दिक तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यावरून त्यांनी आज सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्यांना समज दिली.

कोरोना सारख्या आजाराने सर्व सामान्याचे कंबरडे मोडले असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना त्यांच्याकडून जास्त शुल्क आकारण्यात येऊ नये व ग्राहकांनी सुद्धा जास्त शुल्क देऊ नये असे आवाहन निवासी नायब तहसीलदार दिलीप राठोड यांनी केले आहे.

Copyright ©