विदर्भ

डी पी चे काम करीत असतांना तारेला स्पर्श झाल्याने पोल वरून जमिनीवर पडून खाजगी युवक गंभीर जखमी; दोषी सहाय्यक अभियंता व इतरावर कारवाईची मागणी

 

दि.15 एप्रिल 2021 रोजी दिनेश गेडाम राहणार टुंड्रा ता.किनवटजि.नांदेड खाजगी येथील युवकास सारखणी येथील डीपी चे काम करावयाचे आहे म्हणून बोलावून घेऊन कंपनीचा कर्मचारी नसताना चालू डीपी चे काम करायला लावले असताना विद्युत पुरवठा चालू असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने पोल वरून जमिनीवर पडून तो गंभीर जखमी झाला. प्रकरणी दोषी अधिकारी राम चव्हाण व इतरावर वर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी दि.17एप्रिल 2021 रोजी भाजपचे तालुका सरचिटणीस पुरुषोत्तम येरडलावार यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रारी निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सहाय्यक अभियंता राम चव्हाण यांनी दि.15 एप्रिल 2021 रोजी दिनेश गेडाम राहणार टुंड्रा तालुका किनवट जिल्हा नांदेड या खाजगी युवकास आपणास सारखणी येथील डीपी चे काम करावयाचे आहे म्हणून बोलावून तो कंपनीचा कर्मचारी नसताना डीपी चे काम करत असताना विद्युत पुरवठा चालू असलेल्या पोलवर चढवून अपघात घडवून आणला. सदर डी पी चे काम करतात असताना विद्युत पुरवठा चालू असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने पोल वरून जमिनीवर पडला व गंभीर जखमी झाला. डोक्याला हाताला व पायाला मार लागला व डावा हात भाजला गेला अशा गंभीर अवस्थेत असताना सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांनी पळ काढला.
उपस्थित व नातेवाईक यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या दिनेश गेडाम खाजगी वाहनाने उपचारासाठी नांदेड येथे नेले संबंधित युवक दिनेश गेडाम हा गरीब कुटुंबातील असल्याने त्याला आर्थिक मदत करून दोषी अधिकारी श्री राम चव्हाण व इतर कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत तसेच मुख्य अभियंता नांदेड, अधीक्षक अभियंता नांदेड, कार्यकारी अभियंता भोकर, उपकार्यकारी अभियंता किनवट यांनाही निवेदन च्या प्रतिलिपी देण्यात आल्या चे निवेदनात नमूद केले आहे.

 

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©