यवतमाळ

प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर उभे करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढच्या काळात कोरूना बाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत गेली तर प्रत्येक शहरात भयावह स्थिती निर्माण होईल ग्रामीण व शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहे त्यामुळे आज शहरांमध्ये कोरोणाची बिकट अवस्था आहे जर प्रत्येक तालुक्यात आय, सी, यु ऑक्सीजन बेड , व्हेंटिलेटर बेड मोफत कोविड सेंटर उभी करण्यात आली तर रुग्णांची जी धावपळ होते ती होणार नाही यासाठी राज्यातील सर्व पालक मंत्री व आमदार यांना प्रत्येक तालुक्यात एक हजार ते दोन हजार बेड क्षमतेचे मोफत कोविंड सेंटर उभे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी द्याव्या त्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये जी आर्थिक लूट केली जात आहे ती थांबेल व रुग्णांना आर्थिक दिलासा मिळेल त्यामुळे लवकरात लवकर निवेदनाचा विचार करून प्रत्येक तालुक्यात जम्बो कोविड सेंटर त्वरित सुरू करावे असे निवेदन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना आर्णी मनसे तालुका अध्यक्ष सचिन गंधेवार यांनी दिले.

Copyright ©