यवतमाळ

विहीरीत उडी मारुन महिलेची आत्महत्या. आर्णी तालुक्यातील नवनगर येथील घटना.

 

तालुक्यातील नवनगर येथील रूखमाबाई चव्हाण वय 52 वर्ष ही रोज मजुरी करून आपला मुलगा व सुने सोबत राहत होती मृतक महिला ही दोन तीन दिवसापासून आजारी होती तिने 16 तारखेला दवाखाना केला होता रात्री जेवण केल्यानंतर रुकमाबाई बाहेर अंगणात झोपली होती सकाळी ४: 30 च्या दरम्यान तिच्या मुलाला झोपून दिसली नसल्याने मुलाने व गावातील लोकांनी शोध घेतला असता गावाजवळील एका विहिरीत त्या महिलेचा मृतदेह तरंगत दिसला असता नातेवाईकांनी आर्णी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली सदर तक्रारीवरून मर्ग चा गुन्हा दाखल करून मृतक महिलेस ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले व पुढील तपास पोलिस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार अरुण चव्हाण करीत आहे.

Copyright ©