यवतमाळ

दुषित पाणी पिण्यामुळे साथीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चं आहे

सध्या कोरोणा चे रुग्ण वाढतच आहे सोबत च दुषित पाणी पिण्यामुळे साथीचे रुग्ण दिवसेंदिवस राळेगांव शहरात व तालुक्यात गावोगावी वाढतच आहे याला जवाबदार मुख्यत: कॅन चे नुसतेच थंड केलेले पिण्याचे पाणी असल्याच्या प्रतिक्रिया आरोग्य विभागा कडून ऐकावयास मिळत आहे. राळेगांव शहरात व तालुक्यात पंधरा च्या वर आरो वाॅटर प्लॅन्ट आहेत. मोजक्या आरो चे पाणी पिण्यासाठी योग्य,तर काही महाभाग चक्क थंड केलेले पिण्याचे पाणी कॅन द्वारे विकून नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हे महाशय खराब झालेल्या कालबाह्य निकृष्ठ दर्जाच्या कॅनांमधून पाणी पुरवठा करत आहे.
हिवताप,विषमज्वर,सह इतर साथरोग पसरण्याचे मुळ कारण चं पिण्याचे पाणी,असेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत चर्चेअंती असल्याचे कळते. या साथीचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात आहे.या विषयी आरोग्य विभागाचे वतीने स्थानिक प्रशासनास तसा अहवाल देखील सादर केला आहे. पण वैयक्तिक हितसंबंधामुळे दुषित पाणी पुरवठा करणाऱ्यां वर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत नसल्याने,फक्त थंड पाणी विका एवढाच संदेश प्रशासना कडून सबंधितांना तर मिळाला नाही ना?
अशी शंका नागरिकांना येत आहे हे विशेष…

Copyright ©