यवतमाळ

ज्याच्यावर गावाची धुरा, तेच करत आहे बेजबादारपना

 

नाका पार्डी गावातील आरोग्याची जबाबदारी ज्यांच्यावर त्यांनीच हात वर केल्याने गावातील सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे
नाका पार्डी या गावात 1500 लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावा, आणि 80 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडतात.ते पण फक्त 280 रुग्णांच्या तपासणीत. जवळ जवळ 30 टक्के लोक संक्रमित आहे, तरीही स्थानिक प्रशासन या वर कसलेही गंभीर दिसुन येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात संक्रमण असुन सुद्धा गावात कसल्याही प्रकारचे प्रतिबंधित झोन तर नाहीच परंतु कोणत्याही प्रकारची दक्षता सुद्धा घेण्यात येत नाहि सोशल डीस्टॅन्स तर कुठेच नाहि अनेकाच्या तोंडाला सुध्दा मास नाही सरपंच सदस्य यांनी अजुन पर्यंत दखल घेतली नाही विशेष म्हणजे याच्याही परिवारात बाधित असताना च्या सुद्धा परिवार मधले लोकांना कोरोना ची लागण झाली असल्या मुळे, त्यांनी सुद्धा आपली टेस्ट करून गृह विलागिकरण होणे आवश्यक असताना सुद्धा कुणीही विलिगिकरन झालेले पाहवयास मिळाले नाही.त्यानंतर सुद्धा गावात वाढत्या कोरोना वर कसल्याही उपाय योजना आखताना स्थानिक प्रशासन दिसत नाही.यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या मुळे गावातील नागरिक हे या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी मागणी करत आहे.

Copyright ©