यवतमाळ

गर्दी करणाऱ्या , मास्कविना फिरणाऱ्यांना आवरणार कोण ? आता लोकप्रतिनिधींनीच रस्त्यावर उतरण्याची गरज

 

जिल्हयातील पांढरकवडा तालुक्यातील कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे . त्यामुळे विषाणूंची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता , परंतु गरिबांचे हाल होतील भीतीने खासदारांसह आमदारांनी त्यास विरोध केला अन् प्रशासनाने तातडीने निर्णय बदलला . त्यामुळे श्रेय लाटत लोकप्रतिनिधींनी जल्लोष साजरा केला . त्यांच्या या प्रकारामुळे अप्रत्यक्षरीत्या सामान्यांमध्ये कोरोनाच्या निबंधाबाबतचे गांभीर्य कमी झाले आहे . आता लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून गर्दी करणारे व मास्कविना फिरणाऱ्यांना आवरण्याची गरज निर्माण झाली आहे . तालुक्यातील प्रत्येक वसाहतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे . पहिल्या लाटेत चिमुकले या संसर्गातून बचावले होते . दुसऱ्या लाटेत एक महिन्याच्या आतील शेकडो लोक कोरोनाने मरण पावण्याच्या घटना घडत आहेत . त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनही हादरले आहे . दररोज सरासरी 8 हून अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे . रुग्ण वाढीच्या तुलनेत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेडही शिल्लक नसल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे . जिल्ह्यातील कोरोना प्रसाराचा वेग आणि विषाणूंची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने ९ दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता . दरम्यान , या निर्णयामुळे जिल्ह्यात मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणारे लाखोलोक अडचणीत येतील . त्यांच्यावर उपासमारीसह बेरोजगारीचे संकट कोसळेल , या भीतीने खासदारांसह आमदार , मुस्लिम , दलित संघटनांनी कडक लॉकडाऊनला विरोध केला . या असहकार्यामुळे प्रशासनाला रात्रीतून निर्णय बदलावा लागला . आपल्यामुळेच प्रशासनाने माघार घेतली असे म्हणत लोकप्रतिनिधींनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून जल्लोषही केला . त्यांच्या या प्रकारानंतर जिल्ह्यातील नागरिकांनी पुन्हा कोरोना नियमावलीकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे . शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत गर्दी वाढत आहे , विनाकारण फिरणारे , तसेच मास्कविना फिरणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे . त्यामुळे आता यांना आवरण्यासाठी लोकप्रतिनिधी स्वतः रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे .

..तरच परिणाम जाणवेल कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे . प्रत्येक लोकप्रतिनिधी मग खासदार , आमदार , नगरसेवक असो की , जिल्हा परिषद , नगरपालिका , ग्रामपंचायत सदस्य , प्रत्येकांनी आपापल्या भागात गर्दी करणारे , मास्कविना फिरणाऱ्यांना आवरण्याची गरज आहे . प्रशासनासोबतच राजकीय नेत्यांनी नियमांचे

Copyright ©