यवतमाळ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मास व सेनीटायझर वाटप.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम.

आर्णी तालुक्यातील जवळा येथे कोरोना चे नियम पाळून बस स्टॉप परिसरातील समाज मंदिर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर बस-स्टॉप परिसरात विना मास फिरणाऱ्यांना मास व सॅनिटायझर वाटप केले व कोरोणा संकटात विना मास फिरू नये कोरणा चे नियम पाळावे घरी रहा सुरक्षित रहा शासनाला मदत करा असे मार्गदर्शन देखील करण्यात आले या कार्यक्रमाला आर्णी प.स.सभापती विलास अगलधरे, सरपंच प्रणिता आडे, उपसरपंच बाबाराव खोडणकर, माजी सरपंच संजय सुखदेव, माजी उपसरपंच भारत काळबांडे, दिलीप कावरे ,साहेबराव मुजमुले, देविदास गेडे, ताराचंद ऊके व गावकरी उपस्थित होते.

Copyright ©