यवतमाळ

सावरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

 

घाटंजी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती बुधवारी (दि.१४) तालुक्यातील सावरगाव (मंगी) या गावी अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व वाढत्या कोरोनाचे सावट असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करावी, असे अवाहन सर्व समाजबांधवांनी केले असून, त्यानुसार जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय जयंती उत्सव बौद्ध एकता मंडळांनी घेतला आहे. कोरोनाचे भय मनात असताना ही बौद्ध बांधव याना मनात जयंतीचा उत्साह असल्याचे दिसून आला

भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवारी साजरी करण्याच्या यानिमित्ताने बौद्ध विहार पूर्ण निळेमय झाले येथे साफ सफाई व स्वछता करण्यात आली डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सामाजिक अंतर ठेवून अभिवादन करण्यात आले व वंदना पंचशील घेण्यात आली यावेळी महिला मंडळ व सर्व बौद्ध उपासक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पारवा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गौरख चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुंढे व वाघमारे यांच्या देखरेखीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला

Copyright ©