यवतमाळ

जे कोर्टाला नाही जमले ते कोरोना ने करून दाखविले.

यवतमाळ जिल्ह्यातील नाका पारडी येथील प्रकार. गावातील बऱ्याच दिवसापासून मागील एका वर्षापासून नवऱ्यासोबत भांडण होऊन माहेरी आलेली मुलगी अचानक आज नवऱ्याला फोन करून बोलावून सांगते की मला सासरी जायचं आहे, ही किमया नाका पारडी येथे वाढता कोरोना संसर्ग ने करून दाखविली.गावात मागील चार दिवसात 80 positiv कोरोना रुग्ण आढळले,आणि ज्या भागात त्या मुलीचे वडिलाचे घर आहे त्याच्या आजू बाजूला कोरोना रुग्ण जास्त प्रमाणात आढळले. या भीती पोटी शेवट आपल्या नवऱ्यासोबत चे सर्व भांडण विसरून त्याच्या सोबत मुलांना घेऊन सासरी जायला निघाली. म्हणजे बऱ्याच दिवसापासून कोर्टाच्या खर्चाच्या मार्गातून जे निष्पन्न नाही होऊ शकले, ते एका कोरोना सारख्या आजाराच्या भीतीने करून दाखविले.

Copyright ©