यवतमाळ

संजीवन मध्ये कोविड व नॉन कोविड उपचार सेवा कार्यान्वित

यवतमाळ
स्थानिक संजीवन हॉस्पिटलमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी शासनमान्य माफक दरात उपचार सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। या करिता हॉस्पिटलमधील प्रथम मजल्यावर 33 बेड्स पुर्णपणे आरक्षित असून त्यांच्याकरिता जाणे येण्याचा मार्ग स्वतंत्र असणार आहे । कोविड रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, मॉनिटर, कोरोना चाचणी, सिटी स्कॅन, अत्यावश्यक औषधी, दोन्ही वेळेस जेवण, चहा, नाश्ता आदी सुविधा राहणार आहे। रुग्णालयात दहा बेडचे आय सी सी यु असून स्वतंत्र कक्ष सुविधा राहणार आहे।
यासोबतच सामान्य (कोविड निगेटिव्ह) रुग्णांसाठी संपूर्णपणे वेगळी व स्वतंत्र व्यवस्था असून यासाठी 67 बेड्स राखीव आहेत। कोविड रुग्ण व सामान्य रुग्ण एकमेकांच्या संपर्कात येऊ नये याकरिता मार्ग विभाजन करण्यात आले आहे। त्यामुळे सामान्य रुग्ण व नातेवाईकांना घाबरण्याचे काहीही कारण नाही। रुग्णालयात नेहमीप्रमाणे ओ पी डी, रुग्ण भरती, सामान्य आजार, हार्ट अटॅक, एनजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, आय सी यु, अपघात विभाग, प्रसूती व बालरोग, इतर सर्व ऑपरेशन नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे। कोविड उपचार सेवा संबंधी अधिक माहिती साठी पेशंट समन्वयक 9359367927 व पीआरओ 9975032841 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संजीवनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ सुनील अग्रवाल यांनी केले आहे

Copyright ©