यवतमाळ

13 मृत्युसह जिल्ह्यात 588 नव्याने पॉझेटिव्ह 453 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 12 : गत 24 तासात 13 मृत्युसह जिल्ह्यात 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 453 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 58, 48, 45, 80, 54, 70 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 52 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 32 व 71 वर्षीय महिला, नेर शहरातील 55 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 588 जणांमध्ये 360 पुरुष आणि 228 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 193 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 51, पांढरकवडा 49, पुसद 45, वणी 43, कळंब 39, दारव्हा 38, महागाव 37, नेर 23, मारेगाव 19, बाभुळगाव 17, उमरखेड 12, आर्णि 11, घाटंजी 8 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

सोमवारी एकूण 4034 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3446 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3307 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2094 तर गृह विलगीकरणात 1213 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34638 झाली आहे. 24 तासात 453 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 30572 आहे. तर जिल्ह्यात एकूण 759 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.73 असून मृत्युदर 2.19 आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 315637 नमुने पाठविले असून यापैकी 313588 प्राप्त तर 2049 अप्राप्त आहेत. तसेच 278950 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

एका आठवड्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखले चार बालविवाह

गाव बाल संरक्षण समितीची सतर्कता

यवतमाळ, दि. 12 : जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे एकाच आठवड्यात चार बाल विवाह थांबविण्यात आले. यामध्ये नेर तालुक्यातील चिकणी डोमगा येथील बालिका वय 17 वर्ष हिचा विवाह 1 एप्रिल रोजी, पुसद

शहरातील वय 14 वर्ष बालिका व दारव्हा तालुक्यातील मोरगव्हाण येथील 17 वर्षीय बालिका यांचा विवाह 6 एप्रिल रोजी आणि दारव्हा तालुक्यातील वडगाव येथील 17 वर्षीय बालिका हिचा विवाह 7 एप्रिल रोजी होणार होता.

सदर बालविवाह हे आप्तसंबधियांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मिळताच तत्परतेने चारही मुलीचे वय निश्चित करण्यात आले व तालुकास्तरीय यंत्रणेला कळविण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष,

पोलिस उपनिरीक्षक, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, चाईल्ड लाईन यांनी प्रत्यक्ष गावात भेट

दिली. सर्वांनी संबधित कुटुंबाना बालिका या अल्पवयीन असून सदर विवाह बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह कायद्याबाबत माहिती सांगून त्यामध्ये नमुद असलेल्या

शिक्षेची व कार्यवाहीची माहिती दिली.

मुलीच्या आई वडिलांनी नियोजित विवाह आम्ही मुलीची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर करू, अशी हमी सर्व

पदाधिका-यांना दिली व तसा लेखी जवाब मुलींच्या आई-वडीलांनी व नातेवाईकांनी दिला. ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

सदर कारवाई ही जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधी तथा परीवेक्षा अधिकारी महेश हळदे, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) अविनाश पिसुर्डे, संरक्षण अधिकारी(संस्था बाह्य) माधुरी पावडे, आकाश बुरेवार,पोलिस निरीक्षक सागर भारस्कर, पोलिस उपनिरीक्षक कारेगावकर, बीट जमादार वानखडे, गोपनीय माहिती अधिकारी पंकज ठाकरे, बीट जमादार सांगळे, महिला पोलिस प्रिया बारेकर, विस्तार अधिकारी सागर भंडारी, संरक्षण अधिकारी श्याम गोमासे, ग्रामसेवक वानखडे, उपसरपंच जाधव, अंगणवाडी सेविका मुक्ता टारफे,

लता गाढवे आदींच्या उपस्थितीत पार पडली.

बाल विवाहाची काही माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाईल्ड लाईन- 1098 वर

माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले आहे.

Copyright ©